jio Best Recharge plan : टेलिकॉम कंपन्या युजर्ससाठी अनेक प्रकारचे प्रीपेड रिचार्ज प्लॅन ऑफर करतात. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये, वापरकर्त्यांना मोफत कॉलिंग तसेच डेटा, एसएमएस आणि OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जाते. अनेक युजर्सना फक्त व्हॉईस कॉलिंग प्लॅनची आवश्यकता असते, तर अनेकांना जास्त डेटा हवा असतो. टेलिकॉम कंपन्या वापरकर्त्यांच्या या गरजांनुसार त्यांचे प्रीपेड प्लॅन लॉंच करतात. | jio Best Recharge plan
देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ अशा युजर्ससाठी दीर्घ व्हॅलिडिटी असलेला प्लॅन ऑफर करत आहे. या प्रीपेड प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंगसह दररोज 2GB डेटाचा लाभ मिळतो. याशिवाय 100 मोफत SMS आणि OTT ॲप्सचे सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे. या प्रीपेड रिचार्ज प्लॅनची वैधता तब्बल नव्वद दिवसांची आहे. | jio Best Recharge plan
जिओचा 749 रुपयांचा प्रीपेड प्लान
जिओच्या या रिचार्ज प्लॅनसाठी यूजर्सना 749 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनची वैधता नव्वद दिवसांची आहे. त्यानुसार, लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांना दररोज अंदाजे 8 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये त्यांना संपूर्ण भारतातील कोणत्याही नंबरवर कॉल करण्यासाठी मोफत अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतो. या प्लॅनमध्ये युजर्सना दररोज 2GB डेटाचा फायदा मिळतो म्हणजेच युजर्सना एकूण 180GB इंटरनेट डेटा मिळेल.
जर वापरकर्त्याकडे 5G स्मार्टफोन असेल आणि तो Jio च्या True 5G नेटवर्कमध्ये असेल तर त्याला अमर्यादित मोफत 5G इंटरनेटचा लाभ मिळेल. या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसचा लाभही दिला जातो. Jio च्या या प्रीपेड रिचार्ज प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल सांगायचे तर, तुम्हाला Jio च्या OTT ॲप्स Jio TV आणि Jio Cinema वर मोफत एंट्री मिळेल. रिलायन्स जिओचा हा रिचार्ज प्लान फक्त स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी आहे. जिओ फोन वापरकर्ते या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांचा लाभ घेऊ शकणार नाहीत. | jio Best Recharge plan