मुंबई – अभिनेता अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘सिंघम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील अजयच्या स्टाइल आणि लुकचे विशेष कौतुक झाले होते. या चित्रपटाचा दूसरा भाग ‘सिंघम रिटर्न्स’ देखील सुपरहिट झाला होता. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे. ‘सिंघम अगेन’ (Singham again) असे या चित्रपटाचे नाव आहे. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
‘सिंघम अगेन’च्या शूटिंगच्या मुहूर्तादरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सुपरस्टार अजय देवगनसह रणवीर सिंह सिम्बा लूकमध्ये दिसत आहे. यात अजय देवगण आणि रोहित शेट्टीसह रणवीर सिंह पूजा करताना दिसत. या चित्रपटात पुन्हा एकदा रणवीर आणि अजयला एकत्र दिसणार असल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिनेमात दोघेही शत्रूंचा सामना करताना दिसणार आहेत.
रोहित शेट्टी पोस्ट
रोहित शेट्टीने इनस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘सिंघम, सिंघम रिटर्न, सिम्बा, सूर्यवंशी… 12 वर्षांपूर्वी, जेव्हा आम्ही सिंघम बनवला तेव्हा ते कॉप युनिव्हर्समध्ये बदलेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते! आज, आम्ही सिंघम अगेनचे चित्रीकरण सुरू करत आहोत… आमच्या कॉप फ्रँचायझीमधील 5 वा चित्रपट. इसमे हम अपनी जान लगा देंगे! बस आपके प्यार और दुआ की जरूरत है!’
View this post on Instagram
दरम्यान, ‘सिंघम अगेन’ या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची झलक दिसणार आहे. अजय देवगनच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसेल. तर करीना कपूर देखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. अखेर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाल्याने लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.