Live Cricket Score, MI vs DC Indian Premier League 2024 : आयपीएल 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. याआधी संघ सलग 3 सामने हरला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिल्लीला 235 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात दिल्ली संघाला 20 षटकांत 7 गडी गमावून 205 धावा करता आल्या. अशाप्रकारे मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला.
पाच सामन्यांतील चौथ्या पराभवासह दिल्लीचा संघ गुणतालिकेत खालच्या 10व्या स्थानावर घसरला आहे. त्याचबरोबर सलग तीन सामने गमावल्यानंतर पहिला विजय नोंदवत मुंबईचा संघ आठव्या स्थानावर पोहोचला आहे. दिल्लीचा पुढील सामना 12 एप्रिल रोजी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध एकाना येथे होणार आहे. त्याचवेळी 11 एप्रिलला वानखेडेवर मुंबई संघाचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे.
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीकडून पृथ्वी शॉने 40 चेंडूंत आठ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. तर अभिषेक पोरेल आणि ट्रिस्टन स्टब्सची महत्त्वपूर्ण खेळीही संघाला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. ट्रिस्टन स्टब्सने 25 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी खेळली. या खेळीत त्यानं 3 चौकार अन् 7 षटकार लगावले तर अभिषेक पोरेल याने 31 चेंडूत 5 चौकारासह 41 धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंत आणि डेव्हिड वॉर्नरने अपेक्षित कामगिरी केली नाही. पंत केवळ 1 तर वाॅर्नर 10 धावा काढून माघारी परतला.
मुंबईची गोलंदाजी….
यादरम्यान मुंबईकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक 4 बळी घेतले. त्याने 4 षटकात 34 धावा दिल्या तर जसप्रीत बुमराहने 4 षटकात 22 धावा देताना 2 बळी घेतले. रोमारियो शेफर्डने 4 षटकात सर्वाधिक 54 धावा देताना 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या.
शेफर्डच्या शेवटच्या षटकातील 32 धावा ठरल्या निर्णायक…
एके काळी मुंबईची धावसंख्या 17 षटकांत 4 गडी बाद 167 धावा होती. यानंतर डेथ ओव्हर्समध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांच्या तुफानी फलंदाजीमुळे मुंबईला मोठी धावसंख्या गाठता आली. मुंबईने शेवटच्या पाच षटकात 96 धावा केल्या. रोमारियो शेफर्डने एनरिक नॉर्टजेच्या 20व्या षटकात 32 धावा काढल्या, जे दिल्लीच्या पराभवाचे कारण बनले. 235 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून 205 धावाच करू शकला. 19व्या षटकापर्यंत दिल्लीने 201 धावा केल्या होत्या, तर मुंबईने 202 धावा केल्या होत्या. हे पाहता शेफर्डने शेवटच्या षटकात काढलेल्या 32 धावा निर्णायक ठरल्या.
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 27 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांच्यात 13 चेंडूत 53 धावांची भागीदारी झाली. रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले. या फलंदाजाने एर्निक नॉर्खियाच्या शेवटच्या षटकात 32 धावा काढल्या. तर टीम डेव्हिडने 21 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकांत 96 धावा जोडल्या.
याआधी रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावा केल्या. इशान किशनने 23 चेंडूत 42 धावांची खेळी केली. मात्र, सूर्यकुमार यादव शून्यावर आणि टिळक वर्मा 6 धावा काढून झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. पण अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्डने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना घाम फोडला.
IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी….
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अक्षर पटेल आणि एर्निक नोरखिया हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. अक्षर पटेल आणि एर्निक नॉर्खियाने 2-2 बळी घेतले. याशिवाय खलील अहमदने 1 बळी आपल्या नावावर केला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी एर्निक नॉर्खियाच्या 4 षटकात विक्रमी 65 धावा दिल्या.