Suryakumar Yadav React : ‘…अन् आमचा घात झाला!’, पराभवानंतर सूर्याचा प्रांजळ कबुलीजबाब; कोणावर फोडलं पराभवाच खापर?
Suryakumar Yadav React : सूर्यकुमार यादवने या पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, फलंदाजांच्या अपयशामुळेच हा सामना हातातून गेल्याचे त्याने कबूल केले आहे.

Suryakumar Yadav Reacts to MI Loss IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या ८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा ६ गडी राखून पराभव केला आहे. हार्दिक पंड्याच्या अनुपस्थितीत मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादवने या पराभवानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली असून, फलंदाजांच्या अपयशामुळेच हा सामना हातातून गेल्याचे त्याने कबूल केले आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ६ गडी राखून पराभव पत्करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १६२ धावा केल्या होत्या, ज्याचा पाठलाग दिल्लीने १८.१ षटकांतच पूर्ण केला. सामन्यानंतर बोलताना कार्यवाहू कर्णधार सूर्यकुमार यादवने फलंदाजीतील त्रुटींवर बोट ठेवले. सूर्या म्हणाला, “या खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे होते, पण आम्ही किमान १५ ते २० धावा कमी केल्या. हीच आमची सर्वात मोठी चूक ठरली.”
Bullseye from Jasprit Bumrah…this time in the field 🎯
🎥 In case you missed his brilliant direct-hit run-out \|/ 👌
Updates ▶️ https://t.co/lufWYIGWql#TATAIPL | #KhelBindaas | #DCvMI | @mipaltan | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/rUG6DfiTi0
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
समीर रिझवीच्या वादळाने फिरवला सामना –
सूर्याने दिल्लीच्या गोलंदाजांचे कौतुक करतानाच युवा फलंदाज समीर रिझवीच्या खेळीचा विशेष उल्लेख केला. “समीरने ज्या पद्धतीने ७ धावांत २ गडी बाद झाल्यावर फलंदाजी केली, त्यानंतर आम्हाला सामन्यात पुनरागमन करण्याची कोणतीही संधीच मिळाली नाही,” असे सूर्याने नमूद केले. रिझवीच्या ९० धावांच्या तुफानी खेळीमुळे मुंबईच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आणि सामना एकतर्फी झाला.
स्वतःच्या विकेटवर व्यक्त केली हळहळ –
या सामन्यात सूर्याने ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली, तरीही तो समाधानी नव्हता. तो म्हणाला, “माझी आणि नमनची विकेट चुकीच्या वेळी पडली. आम्ही १६ व्या आणि १८ व्या षटकात बाद झालो, तिथे जर आम्ही टिकलो असतो तर धावसंख्या १८० ते १८५ पर्यंत पोहोचली असती. या खेळपट्टीवर १८० धावा आव्हानात्मक ठरल्या असत्या.” पराभवाचा धक्का बसला असला तरी, पुढच्या सामन्यात मुंबईचा संघ जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.





