Rohit Sharma Trick : रोहितची ‘ती’ चाल अन् दिल्लीचा पोपट! मैदानावर हिटमॅनने घेतली अक्षरची फिरकी; वाया घालवला DRS, पाहा VIDEO
Rohit Sharma Trick : रोहितने आपल्या एका साध्या हालचालीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला असे काही चकवले की, दिल्लीला आपला महत्त्वाचा 'रिव्ह्यू' गमवावा लागला.

Rohit Sharma Trick DC DRS Waste IPL 2026 : आयपीएल २०२६ मधील आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्माच्या चाणाक्ष बुद्धीचा नमुनाही पाहायला मिळाला. अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात रोहितने आपल्या एका साध्या हालचालीने दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला असे काही चकवले की, दिल्लीला आपला महत्त्वाचा ‘रिव्ह्यू’ गमवावा लागला.
नेमकं काय घडलं?
मुंबई इंडियन्सच्या डावातील ९ व्या षटकात कुलदीप यादव गोलंदाजी करत असताना एक रंजक घटना घडली. कुलदीपच्या एका चेंडूवर यष्टीरक्षक केएल राहुल आणि गोलंदाजाने जोरदार अपील केले. पंच कुमार धर्मसेना यांनी फलंदाज नॉट आऊट असल्याचे सांगितले. मात्र, याच वेळी रोहित शर्मा काही पावले पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. रोहितच्या या देहबोलीमुळे दिल्लीच्या खेळाडूंना वाटले की चेंडू बॅटला लागला असावा आणि रोहित स्वतःहून बाद होऊन बाहेर जातोय.
> Kuldeep was bowling.
> Ball hit Rohit’s pad, KL took the catch.
> Rohit pretended to be OUT.
> Axar took the DRS after looking at Rohit.
> DRS successfully wasted.That was the Peak SHAANA moment.😭🔥 pic.twitter.com/IfUWsmbiLg
— 𝐇𝐲𝐝𝐫𝐨𝐠𝐞𝐧 (@ImHydro45) April 4, 2026
अक्षर पटेल ‘भ्रमात’ अडकला!
ROHIT SHARMA TALKING ABOUT REVIEW & FUN WITH KL RAHUL & KULDEEP YADAV. ♥️👌pic.twitter.com/PPiwBKKdyA
— Tanuj (@ImTanujSingh) April 4, 2026
रोहितची ही कृती पाहून दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला वाटले की चेंडू बॅटला लागला आहे. त्याने तत्काळ डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, जसा अक्षरने रिव्ह्यूचा इशारा केला, तसा रोहित पुन्हा क्रीझमध्ये परतला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हास्य उमटले. रिप्लेमध्ये स्पष्ट झाले की चेंडू आणि बॅटचा लांबपर्यंत संबंध नव्हता, तो पॅडला लागून गेला होता. परिणामी, दिल्लीने आपला एक महत्त्वाचा रिव्ह्यू गमावला.
अक्षरनेच घेतला बदला –
Rohit Sharma playing 4D chess. 🧠 He baited DC into burning a review by “walking,” only to smirk and head back once the signal went up. Pure elite-level trolling.#Rohit #mi #Delhi #Mumbai #ipl pic.twitter.com/81oLmirNMf
— Sharath (@SharathV__) April 4, 2026
रोहितने जरी आपल्या चतुराईने दिल्लीचे नुकसान केले असले, तरी त्याला या जीवदानाचा मोठा फायदा उठवता आला नाही. पुढच्याच षटकात अक्षर पटेलने स्वतः चेंडू हाती घेतला आणि रोहितला ३५ धावांवर बाद केले. रोहितने २६ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार मारला. विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये रोहित शर्मा तब्बल चौथ्यांदा अक्षर पटेलच्या फिरकीचा शिकार ठरला आहे. अक्षरविरुद्ध रोहितची सरासरी केवळ १६.७५ असून त्याला आजही अक्षरचे कोडे उलगडता आलेले नाही.





