Live Cricket Score, MI vs DC Indian Premier League 2024 : आज IPL 2024 च्या 20 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. आतापर्यंतचा प्रवास मुंबई आणि दिल्लीसाठी काही खास राहिलेला नाही. एमआय संघाने तिन्ही सामने गमावले आहेत, तर दिल्लीला चारपैकी तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 234 धावा केल्या.अशा प्रकारे मुबंईनं दिल्ली कॅपिटल्ससमोर 235 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
Innings Break!
A power-packed batting effort powers #MI to a formidable 234/5 🔥
Can Delhi Capitals chase it down 🤔
Follow the Match ▶ https://t.co/Ou3aGjpb7P #TATAIPL | #MIvDC pic.twitter.com/TMHiX0LW4P
— IndianPremierLeague (@IPL) April 7, 2024
मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 27 चेंडूत सर्वाधिक 49 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 6 चौकार आणि 3 षटकार मारले. मात्र अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्ड यांनी शानदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांच्यात 13 चेंडूत 53 धावांची भागीदारी झाली. रोमारियो शेफर्डने 10 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले. या फलंदाजाने एर्निक नॉर्खियाच्या शेवटच्या षटकात 32 धावा काढल्या. तर टीम डेव्हिडने 21 चेंडूत 45 धावांची तुफानी खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. दोन्ही फलंदाजांनी शेवटच्या 5 षटकांत 96 धावा जोडल्या.
याआधी रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. रोहित शर्माने 27 चेंडूत 49 धावा केल्या. इशान किशनने 23 चेंडूत 42 धावांची खेळी केली. मात्र, सूर्यकुमार यादव शून्यावर आणि टिळक वर्मा 6 धावा काढून झटपट पॅव्हेलियनमध्ये परतले. हार्दिक पांड्याने 33 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. पण अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिड आणि रोमॅरियो शेफर्डने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना घाम फोडला.
IPL 2024 (RR vs RCB Match 19) : विराट कोहलीने एकाच सामन्यात नावावर केले 3 मोठे विक्रम…
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी….
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर अक्षर पटेल आणि एर्निक नोरखिया हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. अक्षर पटेल आणि एर्निक नॉर्खियाने 2-2 बळी घेतले. याशिवाय खलील अहमदने 1 बळी आपल्या नावावर केला. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी एर्निक नॉर्खियाच्या 4 षटकात विक्रमी 65 धावा दिल्या.