DC vs MI : समीर रिझवीच्या जोरावर दिल्लीने सलग दुसऱ्या सामन्यात मारली बाजी! मुंबईचा धुव्वा उडवत राखलं तख्त
DC vs MI : दिल्लीचा युवा फलंदाज सिमर रिझवी याने खेळलेल्या वादळी खेळीमुळे मुंबईच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली आणि दिल्लीने सलग दुसरा विजय नोंदवला.

DC vs MI Delhi Capitals beat Mumbai Indians by 6 Wickets : आयपीएल २०२६ च्या ८ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (DC) आपल्या घरच्या मैदानावर, म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला (MI) ६ गडी राखून पराभूत केले आहे. दिल्लीचा युवा फलंदाज समीर रिझवीने खेळलेल्या वादळी खेळीमुळे मुंबईच्या गोलंदाजांची दाणादाण उडाली आणि दिल्लीने सलग दुसरा विजय नोंदवला. मात्र, अवघ्या १० धावांनी समीर रिझवीचं शतक हुकलं.
समीर रिझवी नावाच्या वादळाने मुंबईचा केला पालापाचोळा –
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील हाय-व्होल्टेज सामन्यात समीर रिझवी नावाच्या वादळाने मुंबईचा पालापाचोळा केला. १६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात अतिशय खराब झाली होती. कर्णधार केएल राहुल अवघ्या १ धावेवर बाद झाला, तर नितीश राणा दुर्दैवीरीत्या धावबाद झाला. मात्र, त्यानंतर पाथुम निसांका (४४ धावा) आणि विशेषतः समीर रिझवी यांनी सामन्याचे चित्र पालटले.
A sweet homecoming 🏠
Axar Patel-led @DelhiCapitals make it 2⃣ wins in 2⃣ with a commanding six-wicket victory in Delhi 👏🔝
Scorecard ▶️ https://t.co/lufWYIGWql#TATAIPL | #KhelBindaas | #DCvMI pic.twitter.com/0I3mgme3bL
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
१४ चेंडूत ७० धावा! सिमरचा ‘रुद्रावतार’
Seeing it…
…Hitting it 💪Sameer Rizvi in full flow with 🔙 to 🔙 fifties for @DelhiCapitals 🫡
Updates ▶️ https://t.co/lufWYIGWql#TATAIPL | #KhelBindaas | #DCvMI pic.twitter.com/CXEjhfqbdw
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2026
समीर रिझवीने ५१ चेंडूत १७६.४७ च्या स्ट्राईक रेटने ९० धावांची अविस्मरणीय खेळी केली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ७ गगनचुंबी षटकार खेचले. याचाच अर्थ त्याने ९० पैकी ७० धावा केवळ १४ चेंडूत (चौकार-षटकार) वसूल केल्या. त्याच्या या झंझावातामुळे दिल्लीने हे लक्ष्य १८.१ षटकातच पूर्ण केले. मुंबईसाठी हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत कर्णधार सूर्यकुमार यादवने (५१ धावा) दिलेली झुंज अखेर व्यर्थ ठरली.
मुंबईची फलंदाजी ढेपाळली –
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकात ६ बाद १६२ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने ३५ धावांची आश्वासक सुरुवात केली, पण मुकेश कुमारने एकाच षटकात दोन विकेट्स घेऊन मुंबईला बॅकफूटवर ढकलले. सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि नमन धीरच्या २८ धावांच्या जोरावर मुंबईने सन्मानजनक धावसंख्या उभारली होती. मात्र, दिल्लीच्या गोलंदाजांनी, विशेषतः मुकेश कुमार (२ विकेट्स) आणि अक्षर पटेल यांनी शिस्तबद्ध मारा केला. सलग दुसऱ्या विजयामुळे दिल्लीचा आत्मविश्वास दुणावला असून मुंबईला मात्र पहिल्या पराभवाचा धक्का बसला आहे.





