IPL 2024 (CSK vs PBKS Match 49) : पंजाबचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; चेन्नई संघात 2 मोठे बदल, जाणून घ्या Playing 11…

IPL 2024 (CSK vs PBKS Match Update) : आयपीएल 2024 मधील 49 वा सामना आज (बुधवार,1 मे) चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या होम ग्राउंड चेपॉकवर खेळला जाईल. चेन्नई आणि पंजाब या दोन्ही संघांनी यापूर्वीचे सामने जिंकले आहेत. या सामन्यात चेन्नई आपली लय कायम राखण्याचा प्रयत्न असेल, तर पॉइंट टेबलमध्ये आठव्या स्थानावर असलेल्या पंजाबचे लक्ष प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यावर असेल.
पंजाब किंग्जचा नियमीत कर्णधार शिखर धवन आजही खेळत नाहीये. त्याच्या जागी सॅम करन आजही कर्णधार आहे. तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल ( Toss Update ) हा पंजाब किंग्ज संघाच्या बाजूनं लागला आहे. ( Punjab Kings Won the Toss & elected to Field ) पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी पंजाबने आपल्या प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईसाठी मागील सामन्यात चार विकेट घेणारा मथिशा पाथिराना आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडे या सामन्यासाठी उपलब्ध होणार नाहीत. या दोन गोलंदाजांच्या जागी शार्दुल ठाकूर आणि रिचर्ड ग्लीसन यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ग्लीसन सीएसकेकडून पदार्पण करणार आहे.
🚨 Toss 🚨@PunjabKingsIPL win the toss and elect to bowl against @ChennaiIPL
Follow the Match ▶️ https://t.co/EOUzgkM7XA#TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/1Y83T5v7Of
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
CSK vs PBKS : दोन्ही संघाची प्लेइंग-11 खालीलप्रमाणे….
पंजाब किंग्ज : जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन (कर्णधार), रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, ऋषी धवन, विद्वथ कावेरप्पा, हरप्रीत सिंग भाटिया.
चेन्नई सुपर किंग्ज : अजिंक्य रहाणे, रुतुराज गायकवाड (कर्णधार), डॅरिल मिशेल, मोईन अली, शिवन दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, दीपक चहर, रिचर्ड ग्लीसन, मुस्तफिजुर रहमान.
इम्पॅक्ट सब : समीर रिझवी, मुकेश चौधरी, सिमरनजीत सिंग, शेख रशीद, प्रशांत सोलंकी.
चेपॉक मैदान हे चेन्नई सुपर किंग्जचा गड मानला जातो. येथे संघ खूप मजबूत आहे, त्यांना पराभूत करणे सोपे काम नाही. येथे गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळते. या मैदानावर फलंदाजांना धावा काढणे थोडे अवघड आहे, कारण खेळपट्टी फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज दोघांनाही मदत करते. दव हा देखील येथे एक घटक बनतो. अशा स्थितीत नाणेफेक महत्त्वाची ठरते.
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हे आयपीएलमध्ये आतापर्यंत 28 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नईने 15 वेळा, तर पंजाबने 13 वेळा विजय मिळवला. यावेळीही चेन्नईचा संघ मजबूत आणि चांगला आहे. त्याचबरोबर पंजाबची कामगिरी चांगली झालेली नाही. संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये केवळ सरासरी कामगिरी केली आहे.





