IPL 2024 : करोडों कमावले पण केलं तर काहीच नाही, मॅक्सवेलसह ‘या’ तीन खेळाडूंनी आपल्या संघांला लावला चूना…

IPL 2024 : आयपीएल 2024 नुकतेच संपले. कोलकाता नाईट रायडर्सने या मोसमाचे विजेतेपद पटकावले. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. पण ते एलिमिनेटरमध्ये हरले. दिल्ली कॅपिटल्स याआधीच बाहेर पडली होती. केवळ चार संघच प्लेऑफमध्ये पोहोचू शकले होते. या हंगामासाठी संघांनी कोट्यवधी रुपये खर्च केले होते. मात्र याचा फायदा काही संघांनाच होऊ शकला. या मोसमात करोडो रुपये मानधन घेणारे अनेक खेळाडू फ्लॉप ठरले.
ग्लेन मॅक्सवेल(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) – ऑस्ट्रेलियन खेळाडू ग्लेन मॅक्सवेल हा आरसीबीचा भाग होता. त्याला आरसीबीने 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. पण मॅक्सवेल संघात असण्याचा विशेष फायदा झाला नाही. फलंदाजीत तो अपयशी तर ठरलाच पण त्याला गोलंदाजीतही फारसे यश दाखवता आले नाही. मॅक्सवेलने या मोसमात 10 सामन्यांत 52 धावा केल्या. तसेच 6 विकेट्स घेतल्या. आरसीबीने प्लेऑफपर्यंतचा प्रवास केला. मात्र एलिमिनेटर सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. आरसीबने यंदाच्या मोसमात 14 सामने खेळले आणि त्यापैकी 7 जिंकले.
देवदत्त पडिक्कल (लखनौ सुपर जायंट्स) – लखनौ सुपर जायंट्सला चूना लावून देवदत्त पडिक्कल गेला आहे. लखनौने त्याला राजस्थान रॉयल्सकडून ट्रेडद्वारे घेतले. पडिक्कल याला मानधन म्हणून 7.75 कोटी रुपये मिळाले. पण त्याची कामगिरी काही खास नव्हती. देवदत्तने आयपीएल 2024 च्या 7 सामन्यात 38 धावा केल्या. त्याला अर्धशतकही करता आले नाही. लखनौ तर यंदा गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर राहिला.
कुमार कुशाग्र (दिल्ली कॅपिटल्स) –दिल्ली कॅपिटल्सला कुमार कुशाग्राकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण तो सपशेल फ्लॉप ठरला. दिल्लीने कुशाग्रला मानधन म्हणून 7.20 कोटी रुपये दिले. पण त्याला आपली प्रतिभा दाखवता आली नाही. कुमार कुशाग्रला आयपीएल 2024 च्या 4 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या काळात त्याने केवळ 3 धावा केल्या. त्याचा संघ म्हणजे दिल्ली कॅपिटल्यही पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. दिल्लीने 14 सामने खेळले आणि 7 जिंकले आमि 7 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.





