पुणे– वीर बहादूर सिंग पूर्वांचल (व्हीबीएसपी) विद्यापीठ, जौनपूर आणि सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी संघर्षपूर्ण विजयासह येथे सुरू असलेल्या एसएनबीपी 28 व्या नेहरू अखिल भारतीयआंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
उपांत्यपूर्व फेरीच्या लढती कमालीच्या चुरशीने खेळल्या गेल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने बंगळूर विद्यापीठ संघाचा तगडा बचाव भेदत 1-0 असा विजय मिळविला. तिसरा क्रमांक मिळविलेल्या बंगळूर सिटी विद्यापीठ संघाचा प्रतिकार तोकडा पडला. त्यांना व्हीबीएसपी संघाकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-2 अशा पराभवाचा सामना करावा लागला.
नियोजित वेळेत सामना 2-2 असा बरोबरीत सुटला होता. पहिल्या उपांत्यपूर्व पेरीत व्हीबीएसपी विद्यापीठ आणि बंगळूर सिटी विद्यापीठ संघां दरम्यान सामना कमालीचा चुरशीचा झाला. हा सामना पूर्ण वेळेत बरोबरीत सुटल्यामुळे शूटआऊटद्वारे निकाल
काढला गेला.