निमसाखर- येथील परिसरात गेल्या काही महिन्यांपूर्वी भोपळ्याची लागवड शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, वातावरणातील सततच्या बदलामुळे भोपळा या वेलींवर बुरशी, फळकुज,करपा यांसह अन्य रोगांमुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे फळबागांप्रमाणेच वेल सदृश्य पिकांवरही दुषपरीणाम होत असल्याचे दिसून येते आहे.
निमसाखर (ता. इंदापूर) पासून केवळ दीड किलोमीटर अंतरावरील वीर वस्तीपासून पुढे काही अंतरावर काशिनाथ बळवंत रणवरे यांची शेती आहे. रणवरे यांचा मुलगा संदीप रणवरे यांनी ऑगस्टमध्ये भोपळ्याची लागवड केली. तत्पूर्वी शेताची मशागत करत भोपळा लागवडीसाठी लागणारे बी बारामती संघातून खरेदी केले. या भोपळा पिकांमध्ये अडीच बाय सात फुटाचे अंतर सोडून लागवड केली. लागवडीनंतर ड्रीप, लागणारी तार, औषधे, लोखंडी मेका, कळक या सह पंचवीस हजाराच्या आसपास खर्च झाला आहे. गेल्या एक महिन्यापासून भोपळा उत्पन्नाला सुरुवात झाली आहे.
आठवड्याला केली जात हा माल प्लास्टिक पिशवीमध्ये पॅक करत तरकारीच्या माध्ममातून पुणे येथील बाजारात पाठवला जात आहे.आत्तापर्यंत दोन टनापर्यंत माल बाजारात गेला आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात मिळणारा 32 रुपयांपर्यंतचा दर घसरला असून सध्या मालाला पुरेसा भाव मिळत नसू, यासाठी केवळ 18 रुपये दर सध्या मिळत आहे, असे रणवरे यांनी सानगितले. सध्या भोपळा पिकावर फळ कोर्स, करपा, बुरशी यांसारखे रोग पसरू लागले आहेत.