पुणे – पुण्याची सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या पीएमपीला सरळ वाहतूक करता येणार आहे. पुण्यात दिवसेंदिवस वाढती दुचाकी चालकांची संख्या, त्यामुळे मोठ्या वाहनांना वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतो. प्रवाशांचा वेळ वाचावा आणि इच्छित स्थळी लवकर पोहचावे यासाठी पुण्यात काही वर्षांपूर्वी बीआरटी मार्ग तयार केला. आजही आहे. मात्र आता त्याला नियम लावण्यात आले आहेत. जेणेकरून उद्देश सफल होईल, असा मार्ग काढण्यात आला आहे.
डेक्कन कॉलेज चौकाजवळील बीआरटी मार्गात पीएमपीने पहिला ‘बूम बॅरिअर’ (स्वयंचलित फाटक) बसविला आहे. हा प्रायोगिक तत्वावर असून, लवकरच शहरातील उर्वरित 7 बीआरटी मार्गांवर विविध ठिकाणी बसविण्यात येणार आहे.
बीआरटी मार्गात इतर वाहनांची होत असलेली घुसखोरी थांबविणे, गरजेचे आहे. याकरिता पीएमपी प्रशासनाने 4 बूम बॅरिअर बसविण्याचे नियोजन केले होते.
त्यानुसार पहिला ‘बूम बॅरिअर’ पीएमपीने ‘संगमवाडी ते विश्रांतवाडी’ या बीआरटी मार्गावर डेक्कन कॉलेजजवळ नुकताच बसविला आहे. त्याची पीएमपीच्या अधिकार्यांनी पहाणी केली. आता दुसरा साठे बिस्कीट चौकात बसविण्यात येणार आहे. तर पिंपरीमध्ये ‘सांगवी फाटा ते किवळे बीआरटी मार्गावर जगताप डेअरी चौकात आणि काळेवाडी फाटा येथेही बसविण्यात येणार आहे.
‘अॅटोमॅटिक बुम बॅरिअर’च्या वरील भागात एक कॅमेरा बसविण्यात आला आहे. या कॅमेर्याने पीएमपीच्या बसचा क्रमांक स्कॅन झाला की, लगेचच ‘बूम बॅरिअर’ उघडणार आहे. याकरिता आम्ही ताफ्यातील सर्वच्या सर्व बसच्या नंबर प्लेटचे फोटो काढून कॅमेर्यांना पुरविणार आहे. त्यामुळे बस ‘बूम बॅरिअर’ समोर आली की लगेचच फाटक उघडेल.
– दत्तात्रय झेंडे, बीआरटी मॅनेजर, पीएमपीएमएल