Live Cricket Score, IND vs ENG 2nd Test Day 3: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे.
यशस्वी जैस्वालच्या द्विशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 396 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ 253 धावा करू शकला आणि भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात गिलच्या शतकामुळे भारताने सर्वबाद 255 धावा केल्या असून इंग्लंडसमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य आहे.
Innings Break! #TeamIndia posted 2⃣5⃣5⃣ on the board!
Target for England – 399.
Scorecard ▶️ https://t.co/X85JZGt0EV #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Tmoa1iOWRN
— BCCI (@BCCI) February 4, 2024
या डावात भारताकडून शुभमन गिलने सर्वाधिक 104 धावा केल्या. यासह अक्षर पटेलने 45 आणि रविचंद्रन अश्विनने 29 धावांचे योगदान दिले. इंग्लंडकडून टॉम हार्टलीने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. याशिवाय रेहम अहमदला तीन, जेम्स अँडरसनला दोन आणि शोएब बशीरला एक विकेट मिळाली.