जवळपास 8 ते 10 हजार कोटींच्या नुकसानीची व्यापाऱ्यांना भीती
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे चीनमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापारास फटका बसला आहे. याचे वाईट परिणाम आता भारतीय हिरे व्यावसायिकांना देखील सहन करावे लागत आहेत. येत्या दोन महिन्यांत कोरोनामुळे भारतीय हिरे उद्योगाला जवळपास 8 ते 10 कोटींचा हजारांचा फटका बसणार असल्याची भीती सुरत मधल्या हिरे व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
Gujarat: Diamantaires in Surat say that #CoronavirusOutbreak in China and Hong Kong will affect their business, have a negative impact on the diamond industry of India and bring them a loss of around Rs 8,000-10,000 Crores in the next two months. (05.02.2020) pic.twitter.com/2BLrBrzp5D
— ANI (@ANI) February 6, 2020
कोरोनामुळे चीनमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर झाली आहे. तर जवळपास 600 च्या जवळपास लोकांचे जीव आतापर्यंत गेले आहेत. जगभरातील अनेक देशांनी चीनमध्ये कामानिमित्ताने वास्तव्यास असलेल्या त्यांच्या देशातील नागरिकांना मायदेशी परत आणले आहेत. ऍपलसारख्या अनेक मोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या कंपन्या बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांना याचा आर्थिक फटका बसला आहे. पुढील दोन महिन्यांत गुजरातमधल्या हिरे व्यावसायिकांनादेखील यामुळे मोठं आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे.
जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिनेश नवाडिया यांनीदेखील एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या प्रतिक्रियेत नुकसान सहन करावं लागत असल्याची खंत व्यक्त केली आहे. भारतातून जवळपास 95% पॉलिश केलेले हिरे निर्यात केले जातात. त्यातील सर्वाधिक हे हॉंगकॉंग आणि चीनमध्ये निर्यात होतात.
हॉंगकॉंग आणि चीनमध्ये एकूण 41 % हिरे निर्यात केले जातात. जवळपास 45 हजार कोटींचा हा व्यवसाय आहे. मात्र कोरोनामुळे चीन, हॉंगकॉंगमध्ये असलेले व्यापारी परतत आहे. पुढील महिन्यात इथे मौल्यवान खडे, हिऱ्यांचे अनेक प्रदर्शन होणार आहेत मात्र अनेक प्रदर्शनं रद्द करण्यात आली आहेत, त्यामुळे हिरे व्यापाराला याचा मोठा फटका बसला असल्याचं ते म्हणाले.