IND vs ENG : ‘हा घमंडी रोतलू ड्रॉसाठी भीक मागत होता…’, हस्तांदोलन वादानंतर वरुण ग्रोव्हरची स्टोक्सवर सडकून टीका

IND vs ENG Ben Stokes Handshake Controversy : भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर एकवेळ भारतावर पराभवाचा धोका होता, पण जडेजा-सुंदरने इंग्लंडच्या आशा धुळीस मिळाल्या. रविवारी, सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी, नाट्यमय वळण आले जेव्हा इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने अनिर्णित सामन्यासाठी (ड्रॉ) प्रस्ताव ठेवला, पण तो नाकारला गेला. यानंतर सामना संपल्यावर त्याने भारतीय खेळाडूंशी हस्तांदोलन न करता त्यांचा अपमान केला. त्यामुळे बॉलीवुड गीतकार आणि दिग्दर्शक वरुण ग्रोवर यांनी स्टोक्सवर सडकून टीका केली.
वरुण ग्रोवरची बेन स्टोक्सवर टीका –
बेन स्टोक्स सामन्याच्या शेवटच्या तासापूर्वी भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आणि वॉशिंगटन सुंदर यांच्याशी हस्तांदोलन करून ड्रॉवर सहमती दर्शवण्याच्या मनस्थितीत होता, पण दोघांनीही नकार दिला. जडेजा आणि सुंदर तेव्हा शतकाच्या जवळ होते. स्टोक्सच्या या घाईगडबडीमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि त्याच्यावर खूप टीका झाली. बॉलीवुड गीतकार आणि दिग्दर्शक वरुण ग्रोवर यांनीही स्टोक्सवर टीका केली, त्याला “घमंडी रोतलू” म्हटले.
THE DRAW DRAMA BETWEEN ENGLAND, JADEJA AND SUNDAR. 🔥#INDvsENG #Jadeja #INDvsENGTest #INDvENG #BenStokes pic.twitter.com/qZ1pIfdt2F
— 🇮🇳 PREM KUMAR YADAV 🇮🇳 (@Indian_6789) July 28, 2025
घमंडी रोतलू ड्रॉसाठी भीक मागत होता –
ये घमंडी रोतलू जो हर बार out होने पर ऐसी शकल बनाता है जैसे सामने वाले bowler का कोई skill नहीं था इसकी विकेट लेने का, बस इसका अपना ही ध्यान भटक गया और मिडल स्टंप चटक गया – ये आज ड्रॉ की भीख माँग रहा था। और जब वो नहीं मिली तो इसका feudal दिमाग़ मक्कारी पर उतर आया और हमारे दो… pic.twitter.com/pfgGL4SqmH
— वरुण 🇮🇳 (@varungrover) July 27, 2025
वरुण यांनी हस्तांदोलन वादानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिले, “हा घमंडी रोतलू, जो प्रत्येक वेळी बाद झाल्यावर असा चेहरा करतो की जणू समोरच्या गोलंदाजात काही कौशल्यच नव्हते. आज ड्रॉसाठी भीक मागत होता. जेव्हा त्याला ड्रॉ मिळाला नाही, तेव्हा त्याच्या सामंती मानसिकतेने कपट केले आणि आमच्या दोन लढवय्या फलंदाजांचा अपमान केला. ड्रॉचा इतका चटक होता, तर आज सकाळी मैदानावर यायचे नव्हते. जेव्हा आमच्या संघाने तुमच्या हातातून विजय हिसकावला, तेव्हा किती वेळ खेळायचे हे आम्ही ठरवू. १९व्या शतकातून पुढे जा, इंग्रजांनो.”
हेही वाचा – IND vs ENG : अखेर मँचेस्टर कसोटी अनिर्णीत! जडेजा-सुंदरच्या शतकाने इंग्लंडच्या मनसुब्यावर फेरलं पाणी
पहिल्या डावात ३११ धावांनी पिछाडीवर असतानाही भारताने दुसऱ्या डावात ४ बाद ४२५ धावा करून सामना अनिर्णित राखला. जडेजाने नाबाद १०७, सुंदरने नाबाद १०१ आणि कर्णधार शुबमन गिलने ९० धावांचे योगदान दिले. केएल राहुलनेही ९० धावा केल्या. सामन्याच्या सुरुवातीला दोन विकेट्स शून्य धावांवर गमावल्यानंतर भारताने दाखवलेल्या संयमाने इंग्लंडला चकित केले. कर्णधार गिलने फलंदाजांचे कौतुक करत जडेजा आणि सुंदर यांना शतकाचे हकदार ठरवले.
हेही वाचा –IND vs ENG : रवींद्र जडेजाने इंग्लंडमध्ये रचला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई खेळाडू
मँचेस्टर कसोटीनंतर तो म्हणाला, “नक्कीच, हे मैदानावरील फलंदाजांवर अवलंबून होते. त्यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली आणि त्या वेळी दोघेही ९० धावांच्या जवळ होते, त्यामुळे आम्हाला वाटले की ते शतकाचे हकदार आहेत. गेल्या काही दिवसांपासून आमच्या फलंदाजीवर खूप दबाव होता. पण सुरुवातीच्या दोन विकेट्स गमावल्यानंतर संघाने ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले, ते कधीच सोपे नव्हते. हा खूपच धाडसी प्रयत्न होता.” इंग्लंड सध्या मालिकेत २-१ ने पुढे आहे. मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलैपासून खेळवला जाईल.





