Sanju Samson Reaction : ‘शतकं हुकल्याचं दुःख नाही!’ संजू सॅमसनच्या ‘त्या’ एका उत्तराने जिंकली चाहत्यांची मने; पाहा VIDEO
Sanju Samson Reaction : सलग दोन शतके हुकण्याबाबत विचारले असता संजूने अत्यंत सकारात्मक आणि मजेशीर उत्तर दिले.

Sanju Samson reaction on missed century: टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विजयाचा मुख्य नायक ठरलेल्या संजू सॅमसनचे शतक अवघ्या ११ धावांनी हुकले. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही तो ९७ धावांवर नाबाद राहिला होता. सलग दोन शतके हुकण्याबाबत विचारले असता संजूने अत्यंत सकारात्मक आणि मजेशीर उत्तर दिले.
शतक हुकल्याची खंत नाही!
पत्रकार परिषदेत संजू सॅमसन म्हणाला, “ही दोन शतकं हुकली आहेत असं मी मानत नाही. एका सामन्यात ९७ आणि दुसऱ्या सामन्यात ८९ धावा करणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. वैयक्तिक शतकापेक्षा मी संघाला चांगली सुरुवात करून देतोय, याचे मला जास्त समाधान आहे. आजकाल टी-२० सामन्यांचे भवितव्य पॉवरप्लेमध्येच ठरते, त्यामुळे ३-४ चेंडू खेळल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणे गरजेचे असते. मी, अभिषेक आणि इशान हेच करण्याचा प्रयत्न करत आहोत.”
ब्रूकने सोडलेला झेल आणि नशिबाची साथ –
Two exceptional knocks 🤝 One fitting response
After producing yet another match-winning knock of 89(42) in the Semi-Final against England, Sanju Samson describes his role, approach & gameplan. 🙌🏻
ICC Men’s #T20WorldCup 👉🏻 FINAL | #INDvNZ | SUN, 8th MAR, 5:30 PM pic.twitter.com/4R6BL6JNM6
— Star Sports (@StarSportsIndia) March 6, 2026
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संजू स्वस्तात बाद झाला असता, मात्र हॅरी ब्रूकने त्याचा अत्यंत सोपा झेल सोडला. या जीवनदानाबद्दल बोलताना संजूने प्रांजळ कबुली दिली. तो म्हणाला, “मी खूप नशीबवान होतो की मला दुसरी संधी मिळाली. तो फटका मारताना माझी चूक झाली होती, पण नशिबाने मला साथ दिली. अनेकदा माझे नशीब खराब असते, पण आज नशिबाने साथ दिली आणि मी त्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला.”
संजूचा ‘बॅक टू बॅक’ धमाका –
All praise for the bowlers! 🙌🏻🔥
Sanju Samson reflects on how Team India’s bowlers kept their cool in the final overs to snatch the game from England and power India into the Grand Finale!
ICC Men’s #T20WorldCup 👉🏻 FINAL | #INDvNZ | SUN, 8th MAR, 5:30 PM pic.twitter.com/P3zvfvSD9i
— Star Sports (@StarSportsIndia) March 6, 2026
संजू सॅमसनने या विश्वचषकात आपल्या फलंदाजीची शैली पूर्णपणे बदलली आहे. त्याने केवळ धावाच केल्या नाहीत, तर त्या अत्यंत वेगाने (स्ट्राइक रेट) केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने ८ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या, ज्यामुळे भारताला २५३ धावांचा डोंगर उभा करता आला.





