Sunil Gavaskar Disappointment : ‘असं करण चुकीचं, हा वर्ल्डकप आहे!’ बुमराहच्या गोलंदाजीदरम्यान घडलेल्या प्रकारावर गावस्कर संतापले
Sunil Gavaskar disappointment : सामन्यादरम्यान मैदानावरील 'डीजे' (DJ) आणि प्रेक्षकांच्या वर्तनावरून महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

Sunil Gavaskar disappointment expresses over the DJ : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. गुरुवारी (५ मार्च) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला. मात्र, सामन्यादरम्यान मैदानावरील ‘डीजे’ (DJ) आणि प्रेक्षकांच्या वर्तनावरून महान फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
नेमकं प्रकरण काय?
इंग्लंडचा संघ २५४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करत असताना, भारताचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह गोलंदाजीसाठी आला. यावेळी मैदानावरील डीजेने प्रेक्षकांना ‘बूम बूम बुमराह’ असा जयघोष करण्याचा आग्रह धरला. बुमराह गोलंदाजीसाठी धावत असतानाही हा गोंगाट सुरूच होता. समालोचन (Commentary) करत असलेल्या गावस्करांना ही गोष्ट अजिबात आवडली नाही.
गावस्करांचा आक्षेप आणि आयसीसीला घरचा आहेर –
गावस्कर म्हणाले की, “षटकांच्या दरम्यान प्रेक्षकांचा उत्साह वाढवणे चुकीचे नाही, पण जेव्हा गोलंदाज चेंडू टाकण्यासाठी धावत असतो, तेव्हा अशा प्रकारे ओरडणे किंवा जयघोष करायला सांगणे चुकीचे आहे. यामुळे खेळाडूचे लक्ष विचलित होऊ शकते. हा विश्वचषक आहे, हे विसरता कामा नये.”
𝙊𝙣𝙘𝙚 𝙞𝙣 𝙖 𝙜𝙚𝙣𝙚𝙧𝙖𝙩𝙞𝙤𝙣 𝙗𝙤𝙬𝙡𝙚𝙧 🫡
2️⃣3️⃣4️⃣ Test wickets
1️⃣4️⃣9️⃣ ODI wickets
1️⃣1️⃣7️⃣ T20I wicketsJasprit Bumrah becomes the 8️⃣th Indian to take 5️⃣0️⃣0️⃣ wickets in Men's International cricket 👏#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/rfVqNXlN0g
— BCCI (@BCCI) March 6, 2026
यापूर्वीही वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ईडन गार्डन्सवर झालेल्या ‘लेझर शो’वर गावस्करांनी कडाडून टीका केली होती. खेळाच्यामध्ये अशा तांत्रिक गोष्टींमुळे व्यत्यय येतो, असे त्यांचे स्पष्ट मत आहे.
भारत चौथ्यांदा फायनलमध्ये दाखल –
भारताने संजू सॅमसनच्या ८९ धावांच्या जोरावर २५३ धावांचा डोंगर उभारला होता. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या जेकब बेथेलने १०५ धावांची झुंजार खेळी केली, मात्र जसप्रीत बुमराह आणि इतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडला २४६ धावांवर रोखले. ७ धावांनी मिळवलेल्या या विजयामुळे भारत आता चौथ्यांदा टी-२० विश्वचषकाची फायनल खेळणार आहे.





