नवी दिल्ली – प्रवासी विमान वाहतुकीच्या क्षेत्रात एक भीषण दुर्घटना नुकतीच टळल्याने अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. न्यू जर्सीच्या नेवार्क येथील लिबर्टी विमानतळावरून युनायटेड एअरलाइन्सचे एक विमान टोम शहराच्या दिशेने हवेत झेपावले. मात्र उड्डाणादरम्यान तीन तासांनी अवघ्या दहा मिनिटांत हे विमान 27 हजार फूट जमिनीच्या दिशेने कोसळू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली.
पायलटने तातडीने आपातकालीन लॅंडिंग करत हे विमान नेवार्कच्या विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले.परंतु तोपर्यंत विमानातील सर्वांचाच जीव टांगणीला लागला होता.
या बोईंग 777 विमानात 270 प्रवासी आणि 40 केबिन क्रू मेंबर्स होते. फ्लाइट अवेअर डेटाचा हवाला देऊन, अमेरिकन मीडियाने वृत्त दिले की नेवार्क ते टोम हे विमान नेवार्क लिबर्टी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून रात्री 8:37 वाजता उड्डाण केले आणि मध्यरात्री 12:27 वाजता विमानतळावर परत आले.
विमान कंपनीने यासंदर्भात एक निवेदन जारी करून सांगितले की, केबिनचा दाब कमी झाल्यामुळे विमानाला नेवार्कला परतावे लागले. विमान सुरक्षितपणे पोहोचले आणि कोणीही प्रवासी जखमी झाला नाही. फेडरेशन एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशननेही दबावाची समस्या मान्य करत केबिनमध्ये दबाव नसल्यामुळे वैमानिकाला विमान वळवण्यास भाग पडल्याचे मान्य केले. नंतर विमानातील सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानात बसवून त्यांच्या अपेक्षित ठिकाणी नेण्यात आले.