खंडाळा, (प्रतिनिधी) – भाजप युवा मोर्चाच्या खंडाळा तालुकाध्यक्षपदी अहिरे येथील हृषीकेश धायगुडे-पाटील यांची निवड झाली आहे. दिवंगत नेते अविनाश धायगुडे यांचे ते चिरंजीव आहेत.
लहानपणापासूनच राजकारणाचे धडे मिळालेल्या हृषीकेश पाटील यांनी वडिलांप्रमाणेच गोरगरीब जनतेसाठी काम करायला प्राधान्य दिले आहे. नागरिकांच्या प्रश्नांबाबत त्यांची भूमिका नेहमी आक्रमक राहिली आहे. अनेक चळवळींमध्ये त्यांचा सहभाग असल्याने तालुक्यात त्यांचा नावलौकिक वाढत आहे. सुशिक्षित, तरुण, तडफदार, शांत व संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून खंडाळा तालुक्यात पक्षाला ‘अच्छे दिन’ आले आहेत.
या निवडीबद्दल हृषीकेश धायगुडे यांचे खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ना. महेश शिंदे, आमदार जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम व पदाधिकार्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे या निवडीनंतर हृषीकेश धायगुडे यांनी सांगितले.