बारामती, (प्रतिनिधी)- इयत्ता बारावीचा निकाल यंदा उत्तम लागल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यंदा बारामती तालुक्याचा निकाल 96.32 टक्के जाहीर झाला आहे. बारामती तालुक्यात 7754 विद्यार्थी या परिक्षेसाठी बसले होते. या पैकी 7469 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून 98. 39 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
बारामती तालुकयात 3762 मुले या परिक्षेसाठी बसलेली होती त्या पैकी 3541 उत्तीर्ण झाली असून ही टक्केवारी 94.12 इतकी आहे. तर 3992 मुलींपैकी 3928 मुली उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी 98.39 इतकी आहे. केवळ 64 मुली अनुत्तिर्ण झाल्या आहेत.
महाविद्यालयनिहाय निकालाची टक्केवारी पुढील प्रमाणे- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती 92.90, एम. एस. काकडे ज्यूनिअर कॉलेज सोमेश्वरनगर- 90. 55, आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय 99.05, श्री शहाजी ज्यूनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स सुपे 99.34, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज बारामती- 89.47, न्यू ज्युनियर कॉलेज वडगाव निंबाळकर 60.86, म. ए. सो. विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज,
बारामती 92.85, शारदाबाई पवार विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज, शिवनगर- 100, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय, मोरगाव 93.67, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, वाणेवाडी 78.57, नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनियर कॉलेज, पणदरे- 99.45, शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर- 99.76, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- 70.58, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय होळ- 100, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान,
वाणिज्य महाविद्यालय- बारामती 93.92, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- 96.57, उत्कर्ष ज्यूनियर कॉलेज वाघळवाडी 96.87, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्यूनिअर कॉलेज, माळेगाव- 66.66, कृषी उद्योग शिक्षण संस्था कार्हाटी 99, एस. व्ही. एम. अँड ज्यूनिअर कॉलेज भिकोबानगर 98.61, सदगुरू शिक्षण मंडळ लोणी भापकर 90, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर 99. 53, श्री सिद्धेश्वर जुनियर कॉलेज को-हाळे बुद्रुक 99.58, श्री सिद्धेश्वर हायस्कूल को-हाळे बुद्रुक 100, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,
पारवडी-100, म. ए. सो. उच्च माध्यमिक विद्यालय- 88. 37, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल- 100, धों. आ. सातव कारभारी विद्यालय, बारामती- 100, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय 100, एसपीसीटीएस ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स 99.71,
क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेज 99. 40, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्रामनगर- 99. 81, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पळशी 100, आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्यूनिअर कॉलेज वंजारवाडी 100, एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्यूनिअर कॉलेज 100,
शारदाबाई पवार आयटीआय, शारदानगर 83.33, मयुरेश्वर प्रा. आयटीआय खंडुखैरेवाडी, सुपे 66.66, शासकीय आयटीआय- 86.20, कृषी उद्योग मूल संस्था खासगी आयटीआय- 66.66, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल) 93.33, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर 75, आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्यूनिअर कॉलेज (व्होकेशनल) 90, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय सुपे (व्होकेशनल) 100, शारदाबाई पवार विद्यालय व जुनिअर कॉलेज, शिवनगर (व्होकेशनल) 91.89, न्यू इंग्लिश स्कूल ज्यूनिअर कॉलेज, वाणेवाडी (व्होकेशनल) 89.47.