मुंबई – राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला दिलासा 17 फेब्रुवारीपर्यंत कायम ठेवला आहे.
पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी ईडीला यापुढे मंदाकिनी खडसे यांची चौकशी करावयाची असल्यास 24 तास आधी नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले. याप्रकरणी बुधवारच्या सुनावणीत ईडीने अतिरिक्त प्रतिज्ञापत्र न्यायालयत सादर केले.
खडसे कुटुंबियांविरोधात ईडीकडून या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रात एकनाथ खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्यासह तीन कंपन्यांचाही आरोपी म्हणून समावेश आहे.
या सर्वांवर मनी लॉड्रींगचा आरोप लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाचलुपचपत प्रतिबंधक विभागामार्फत याची चौकशीही झाली होती. मात्र एसीबीने खडसे यांना याप्रकरणी क्लीन चीट दिली होती.