Harshit Rana Celebration : हर्षित राणाने पुन्हा मारलं मैदान! चार बोटं दाखवून डेव्हॉन कॉनवेला का डिवचलं? पाहा VIDEO
Harshit Rana Celebration : हर्षित राणाने न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेला चौथ्यांदा आऊट केल्यानंतर जबरदस्त सेलिब्रेशन केले.

Harshit Rana Celebration Video Viral : शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात एका अनोख्या ‘बदल्याची’ चर्चा रंगली आहे. भारताचा तरुण वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज डेव्हॉन कॉनवे यांच्यातील मैदानी युद्ध प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. हर्षितने केवळ कॉनवेला बादच केले नाही, तर आपल्या खास सेलिब्रेशनने त्याला चोख प्रत्युत्तरही दिले.
कॉनवेचे वादळ आणि सूर्याची चाल –
टॉस गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडला कॉनवेने आक्रमक सुरुवात करून दिली. त्याने ९ चेंडूंत १९ धावा कुटल्या, ज्यामुळे भारतीय संघ दबावात आला होता. ही धावगती रोखण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने चेंडू हर्षित राणाच्या हाती सोपवला. हर्षितने आपल्या अचूक लाइन-लेंथने कॉनवेला जाळ्यात अडकवले आणि त्याला स्वस्तात माघारी धाडले.
चार बोटांचा इशारा अन् मोठा पराक्रम!
Harshit Rana strikes in the very first over! 💣
A timely wicket from #HarshitRana shifts the momentum in India’s favour as he dismisses Devon Conway for the 4th time on this tour.💪🏻#INDvNZ, 2nd T20I | LIVE NOW 👉 https://t.co/Be1n2FWbLQ pic.twitter.com/KTWtsCdy6b
— Star Sports (@StarSportsIndia) January 23, 2026
कॉनवेला बाद केल्यानंतर हर्षित राणाने हवेत चार बोटे दाखवून जल्लोष केला. त्याच्या या इशाऱ्यामागे एक खास इतिहास आहे. या संपूर्ण न्यूझीलंड दौऱ्यात हर्षितने कॉनवेला जणू स्वतःचा ‘सॉफ्ट टार्गेट’ बनवले आहे. त्याने या दौऱ्यात कॉनवेला तब्बल चार वेळा बाद केले आहे:
कोच गौतम गंभीर हर्षित राणाशी संवाद साधताना
१. पहिला वनडे: हर्षितची पहिली शिकार
२. दुसरा वनडे: पुन्हा हर्षितनेच बाद केले
Devon Conway in this ODI Series
1st ODI – out against Harshit Rana
2nd ODI – out against Harshit Rana
3rd ODI – out against Harshit Rana*1st T20I – Harshit don’t play
2nd T20I – out against Harshit rana18 runs || 4 outs || 5.0 Avg 🔥#INDvsNZ pic.twitter.com/O4XKMyU655
— 420 (@ForIme420) January 23, 2026
३. तिसरा वनडे: तिसऱ्यांदा माघारी धाडले
४. दुसरा टी-२०: चौथ्यांदा आपली ‘दहशत’ सिद्ध केली
मैदानात दिसली गंभीरची ‘झलक’
आयपीएलपासून हर्षित राणाला गौतम गंभीरचा शिष्य मानले जाते. गंभीरप्रमाणेच हर्षित देखील मैदानात आक्रमक विचारसरणी आणि निडर वृत्तीने खेळताना दिसतो. मोठ्या फलंदाजासमोर न डगमगता त्याला आव्हान देणे आणि विकेट काढणे ही आता हर्षितची ओळख बनत चालली आहे. टी-२० वर्ल्ड कपपूर्वी हर्षितचा हा आत्मविश्वास टीम इंडियासाठी शुभसंकेत मानला जात आहे.





