Harshit Rana Hattrick : हर्षित राणाने इंदूरमध्ये पूर्ण केली ‘स्पेशल हॅट्ट्रिक’! न्यूझीलंडच्या ‘या’ फलंदाजाला आणले जेरीस, पाहा VIDEO

Harshit Rana Hattrick against Devon Conway : टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला भारतीय संघात वारंवार मिळणाऱ्या संधीवर सोशल मीडिया आणि काही तज्ज्ञांनी प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, हर्षितने आपल्या घातक गोलंदाजीने या सर्व टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याने सातत्यपूर्ण कामगिरी करत आपण टीम इंडियासाठी योग्य निवड असल्याचे सिद्ध केले आहे. मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने एक खास ‘हॅट्ट्रिक’ पूर्ण केली.
डेव्हॉन कॉनवेचा ‘करंट’ काढला; पूर्ण केली हॅट्ट्रिक
१८ जानेवारी रोजी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेल्या निर्णायक सामन्यात हर्षित राणाने एक खास कामगिरी केली. हर्षितने या मालिकेतील तिन्ही सामन्यांत न्यूझीलंडचा स्टार सलामीवीर डेव्हॉन कॉनवेला बाद केले.
- १. पहिला सामना: ५६ धावांवर असताना बोल्ड केले.
- दुसरा सामना: पुन्हा एकदा बोल्ड करत माघारी धाडले.
- तिसरा सामना: केवळ ५ धावांवर असताना स्लिपमध्ये रोहित शर्माच्या हाती झेल देण्यास भाग पाडले.
First-ball wicket for Harshit Rana! 🔥
Two early wickets, and #TeamIndia are off to a fiery start in Indore 😍#INDvNZ | 3rd ODI | LIVE NOW 👉 https://t.co/CixSjUFkhU pic.twitter.com/ggtyZEdHR9
— Star Sports (@StarSportsIndia) January 18, 2026
एकाच मालिकेत एकाच फलंदाजाला तीनदा बाद करून हर्षितने ‘विकेट्सची हॅट्ट्रिक’ साजरी केली.
हेही वाचा – RCB W vs DC W : शतक हुकलं पण दिल्लीला नमवलं! स्मृती मानधनाची कॅप्टन इनिंग; आरसीबीने ठोकला विजयाचा चौकार
अर्धशतकी भागीदारी फोडली –
हर्षितने केवळ कॉनवेलाच बाद केले नाही, तर न्यूझीलंडची दुसरी धोकादायक जोडीही फोडली. ५ धावांवर २ विकेट्स पडल्यानंतर डॅरिल मिचेल आणि विल यंग यांनी अर्धशतकी भागीदारी करत न्यूझीलंडचा डाव सावरला होता. मात्र, १३ व्या षटकात हर्षितने विल यंगला बाद करून ही जोडी फोडली आणि भारताला तिसरे यश मिळवून दिले. या मालिकेतील हर्षितची ही ५ वी विकेट्स ठरली.
अर्शदीपचीही दमदार एन्ट्री –
या सामन्यात भारतीय संघात एक बदल करण्यात आला होता. प्रसिध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली. अर्शदीपने पहिल्याच षटकात हेन्री निकोल्सला बोल्ड करून भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर हर्षितने खेळाची सूत्रे आपल्या हातात घेतली. २४ वर्षीय हर्षित राणा आता भारतीय वेगवान गोलंदाजीचा नवा चेहरा म्हणून समोर येत आहे.





