Hardik Bumrah Fight : मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये वादाची ठिणगी? भर मैदानात हार्दिक-बुमराह भिडले; पाहा VIDEO
Hardik Bumrah Fight : पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यात भर मैदानात झालेली 'हॉट-टॉक' आता सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

Hardik Pandya Jasprit Bumrah Fight Video Viral : पाच वेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्सची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे. पंजाबविरुद्ध १९६ धावांचा बचाव करताना मुंबईची गोलंदाजी अक्षरशः कचखाऊ ठरली. मात्र, या पराभवापेक्षा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओने चाहत्यांची धडधड वाढवली आहे. या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कर्णधार हार्दिक पंड्याच्या एका निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करताना आणि त्याच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं? (Hardik Bumrah Fight)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, सामन्याच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर बुमराहने हार्दिकला क्षेत्ररक्षणाबाबत काही सूचना केल्या होत्या. मात्र, हार्दिकने बुमराहचा सल्ला धुडकावून लावत स्वतःच्या मनाप्रमाणे फिल्डिंग सेट केली. त्यानंतर बुमराहने निराश होवून विषयचं सोडून दिला. यानंतर बुमराहच्या चेहऱ्यावरील हावभाव स्पष्टपणे सांगत होते की, तो हार्दिकच्या कप्तानीवर अजिबात खुश नाही.
After Jasprit Bumrah dropped Prabhsimran Singh’s catch, Hardik Pandya reacted angrily. Bumrah apologized but looked lost and didn’t bowl at full intensity, while Rohit Sharma appeared extremely disappointed in the dugout 🤯
— ValenceCricket (@CricketValence) April 17, 2026
हार्दिकचा संयम सुटला; दिला ‘मोठ्या’ बदलांचा इशारा – (Hardik Bumrah Fight)
🚨 HEATED ARGUMENT BETWEEN HARDIK PANDYA AND JASPRIT BUMRAH FOR FIELD PLACEMENT 🚨
When Jasprit Bumrah bowling, Hardik Pandya was seen giving suggestions to him and setting the field according to himself, not according to Bumrah.
Jasprit Bumrah argued once but later surrendered… pic.twitter.com/kXouus6xJE
— Cricket Central (@CricketCentrl) April 16, 2026
सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्याचा राग सातव्या आसमानवर होता. त्याने खेळाडूंना जाहीरपणे सुनावले की, आता संघात कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. हार्दिक म्हणाला, “सध्या माझ्याकडे सांगण्यासारखे काही नाही. ही वैयक्तिक चूक आहे की नियोजनाचा अभाव, हे आम्हाला तपासावे लागेल. आता कडक प्रश्न विचारावे लागतील आणि जबाबदारी घ्यावी लागेल.” हार्दिकच्या या विधानावरून पुढील सामन्यात काही ज्येष्ठ (Senior) खेळाडूंना संघातून डच्चू मिळण्याचे संकेत मिळत आहेत. (Hardik Bumrah Fight)
कामगिरीचा आलेख घसरला – (Hardik Bumrah Fight)
The Legacy built over the years is getting broken brick by brick 💔🥺
Wankhede used to be our Fortress but now😞 #IPL #IPL2026 @mipaltan pic.twitter.com/B7YJJO0r3y
— MI Blud☄️ (@micricket2013) April 17, 2026
या सामन्यात क्विंटन डिकॉकचे शतक आणि नमन धीरचे अर्धशतक व्यर्थ ठरले. खुद्द बुमराहने ४ षटकांत ४१ धावा दिल्या आणि त्याला एकही बळी घेता आला नाही. हार्दिकनेही फलंदाजीत १४ आणि गोलंदाजीत ३९ धावा देऊन निराशा केली. मुंबईचा पुढचा सामना २० एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. प्ले-ऑफच्या शर्यतीत टिकण्यासाठी मुंबईला हा सामना जिंकणे अनिवार्य आहे, मात्र त्याआधी हार्दिक आणि बुमराह यांच्यातील हा वाद मिटणार का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. Hardik Bumrah Fight





