IND vs SA : जसप्रीत बुमराहची कमाल! वसीम अक्रमला मागे टाकत SENA राष्ट्रांविरुद्ध रचला नवा इतिहास

Jasprit Bumrah 5 wicket haul records in IND vs SA : भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या १५९ धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेला २०० चा आकडाही गाठू न देण्यात भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचा (Jasprit Bumrah) सिंहाचा वाटा होता. बुमराहने एकट्याने दक्षिण आफ्रिकेच्या निम्मे फलंदाज बाद केले. त्याने १० पैकी ५ विकेट्स घेत अनेक शानदार विक्रम आपल्या नावावर केले.
ईडन गार्डन्सवर पदार्पणातच ‘पंचक’!
जसप्रीत बुमराहने आपल्या कसोटी कारकिर्दीत १६ व्यांदा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. मात्र, यावेळी त्याचा हा पराक्रम विशेष आहे, कारण त्याने ईडन गार्डन्स मैदानावर आपल्या कारकिर्दीतील पहिली कसोटी खेळताना हा कमाल केला आहे. याचा अर्थ, बुमराहने ईडन गार्डन्सवर पहिल्यांदाच ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
𝘽𝙤𝙬𝙡𝙞𝙣𝙜 𝘽𝙡𝙞𝙩𝙯 🔥
Jasprit Bumrah was on a roll at the Eden Gardens ⚡️
Watch his outstanding spell ▶️ https://t.co/If1vSkt7ec#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/01QZZn3d0w
— BCCI (@BCCI) November 14, 2025
SENA देशांविरुद्ध ‘अविश्वसनीय’ विक्रम –
- बुमराहने भलेही आपल्या कारकिर्दीत १६ व्यांदा ५+ विकेट्स घेतल्या असल्या तरी, यापैकी १३ वेळा त्याने SENA (South Africa, England, New Zealand, Australia) देशांविरुद्ध हा पराक्रम केला आहे, जो एक खास विक्रम आहे.
- आतापर्यंत कोणत्याही आशियाई गोलंदाजाने SENA देशांमध्ये इतक्या वेळा ५+ विकेट्स घेतलेल्या नाहीत.
- या बाबतीत बुमराहने पाकिस्तानच्या महान गोलंदाज वसीम अक्रमचा विक्रम मोडला आहे, ज्याने १२ वेळा ५+ विकेट्स घेतल्या होत्या.
हेही वाचा – IPL 2026 Mini Auction : आयपीएल लिलावासाठी ‘परदेशवारी’ कायम! ‘या’ देशात पार पडणार IPL 2026 चा लिलाव
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चौथी ‘शिखर’ कामगिरी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जसप्रीत बुमराहने कसोटीच्या एका डावात चौथ्यांदा५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. या कामगिरीसह त्याने जवागल श्रीनाथ आणि हरभजन सिंग यांच्या विक्रमाची बरोबरी साधली आहे. या यादीत माजी भारतीय फिरकीपटू आर. अश्विन अव्वल स्थानी आहे. ज्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ वेळा पाच आणि पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा – Mohammed Shami : मोहम्मद शमीसाठी ‘या’ दोन संघांत रस्सीखेच! सनरायझर्स हैदराबाद ‘कॅश डील’मध्ये करणार ट्रेड
बुमराहचे शिकार झालेले फलंदाज –
जसप्रीत बुमराहने ज्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना बाद करून आपले ५ विकेट्स पूर्ण केल्या, त्यात रियान रिकल्टन, एडन मार्करम, टोनी डी जॉर्जी, हार्मर आणि केशव महाराज यांचा समावेश आहे.





