MI vs PBKS : श्रेयसच्या ‘किंग्स’ने विजयाचा चौकार ठोकत पटकावलं अव्वल स्थान! मुंबई इंडियन्सचा सलग चौथा पराभव
MI vs PBKS : पंजाब किंग्सने (PBKS) आपला अजेय रथ कायम राखत मुंबई इंडियन्सचा (MI) ७ गडी राखून धुव्वा उडवला आहे.

MI vs PBKS Punjab Kings won by 7 wickets : आयपीएल २०२६ च्या २४ व्या सामन्यात पंजाब किंग्सने (PBKS) आपला अजेय रथ कायम राखत मुंबई इंडियन्सचा (MI) ७ गडी राखून धुव्वा उडवला आहे. मुंबईने उभारलेला १९५ धावांचा डोंगर पंजाबच्या फलंदाजांनी १६.३ षटकात लिलया पार केला. यासह हंगामातील चौथा विजय नोंदवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. या विजयात श्रेयस अय्यर, प्रभसिमरन सिंग आणि अर्शदीप सिंगने महत्त्वाची भूमिका बजावली.
क्विंटन डिकॉकचे शतक ठरले व्यर्थ –
Quin𝗧𝗢𝗡 de Kock! 🤩
Back in the team and he smashes his 3️⃣rd #TATAIPL HUNDRED 💯🔥
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ4zYR#KhelBindaas | #MIvPBKS | @mipaltan pic.twitter.com/stcEEhdSfQ
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. मुंबईची सुरुवात अत्यंत खराब झाली; सलामीवीर रिकेल्टन (२) आणि सूर्यकुमार यादव (०) यांना अर्शदीप सिंहने स्वस्तात बाद केले. मात्र, त्यानंतर क्विंटन डिकॉकने ६० चेंडूंत ११२ धावांचे तुफानी शतक ठोकले, तर नमन धीरने ३१ चेंडूंत ५० धावा केल्या. एकेकाळी मुंबई २१५ धावांपर्यंत मजल मारेल असे वाटत होते, पण मधली फळी कोसळल्याने मुंबईला ६ बाद १९५ धावांवर समाधान मानावे लागले. पंजाबकडून अर्शदीपने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ –
He is HIM! He is Shreyas Iyer 🫡
🎥 Here’s how the #PBKS skipper took on the best to reach his FIFTY 👏
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ429j#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/oG9HFySe8o
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
प्रत्युत्तरात १९६ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना पंजाबला प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य यांनी वेगवान सुरुवात करून दिली. प्रियांश १५ धावांवर बाद झाल्यावर प्रभसिमरन सिंगने ३९ चेंडूंत नाबाद ८० धावांची स्फोटक खेळी करत मुंबईच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले. त्याला कर्णधार श्रेयस अय्यरने (३५ चेंडूंत ६६ धावा) मोलाची साथ दिली. या दोघांमधील शतकीय भागीदारीमुळे पंजाबने सहज विजय मिळवला. मुंबईचे प्रमुख गोलंदाज बुमराह, चहर आणि स्वतः हार्दिक पांड्या या सामन्यात पूर्णपणे निष्प्रभ ठरले.
पंजाब नंबर १, मुंबई तळाला
The winning momentum refuses to stop 🌪️
A flawless record remains perfectly intact 🛡️Punjab Kings conquer the Wankhede to climb up to the top spot in the table! ❤️
Updates ▶️ https://t.co/Fn2dxJ429j#TATAIPL | #KhelBindaas | #MIvPBKS | @PunjabKingsIPL pic.twitter.com/LUuZx5nlbf
— IndianPremierLeague (@IPL) April 16, 2026
या विजयासह पंजाब किंग्सने ५ सामन्यांत ९ गुणांसह (४ विजय, १ रद्द) गुणतालिकेत पहिले स्थान पटकावले आहे. पंजाबने या मोसमात अजून एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, पहिल्या विजयानंतर सलग चार सामने हरलेली मुंबई इंडियन्स आता संकटात सापडली असून त्यांना आपला फॉर्म शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.





