Hardik Pandya Argument : हार्दिक पंड्या पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! माजी खेळाडूला झापलं की चर्चा केली? पाहा VIDEO
Hardik Pandya Argument : हार्दिक पंड्या आणि माजी खेळाडू मुरली कार्तिक यांच्या वादाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Hardik Pandya Argument with Murali Karthik : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला असला तरी, सामन्यापूर्वी घडलेल्या एका घटनेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.
टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या ( Hardik Pandya)आणि माजी क्रिकेटपटू व समालोचक मुरली कार्तिक (Murali Karthik) यांच्यात मैदानावरच वाद झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. एका चाहत्याने रेकॉर्ड केलेला हा व्हिडिओ सध्या वादाचा विषय ठरत आहे.
नेमकं काय घडलं? ‘तो’ व्हिडिओ आला समोर (Hardik Pandya Argument )
शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर सामना सुरू होण्यापूर्वी हार्दिक पंड्या (Hardik Pandya) सराव करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याच्या हातात बॅट आणि ग्लोव्हज होते. यावेळी त्याची भेट कॉमेंट्री टीमचा भाग असलेल्या मुरली कार्तिकशी झाली. सुरुवातीला दोघांनी हस्तांदोलन केले आणि एकमेकांचे अभिवादन केले. मात्र, अवघ्या काही सेकंदातच संवादाचा सूर बदलला.
व्हिडिओमध्ये हार्दिक प्रचंड संतापलेला दिसत असून तो ‘ॲनिमेटेड’ पद्धतीने हातवारे करत काहीतरी बोलत आहे. दुसरीकडे मुरली कार्तिक ( Murali Karthik) त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हार्दिकची देहबोली (Body Language) पाहून तो कोणत्या तरी गोष्टीवर कमालीचा नाराज असल्याचे स्पष्ट जाणवत होते.
Heated exchange between Hardik Pandya and Murali Kartik? Thoughts? 👀 pic.twitter.com/PsKs2ia7TF
— Sameer Allana (@HitmanCricket) January 23, 2026
सोशल मीडियावर चर्चांना उधाण –
🚨 Hardik Pandya angry at Murali Kartik 😡🚨
– Hardik Pandya had an argument with Murali Kartik before the IND vs NZ 2nd ODI in Raipur.
What’s the reason of that argument ? #INDvNZT20I #HardikPandya #Cricket pic.twitter.com/E0kguCOpiC
— cricketkayudh (@cricketkayudh) January 23, 2026
हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी विविध तर्क लावायला सुरुवात केली आहे. अनेक युजर्सनी याला ‘हीटेड आर्ग्युमेंट’ (तीव्र वाद) असे म्हटले आहे. जरी दोघांनी सुरुवातीला हात मिळवले असले, तरी काही क्षणातच हार्दिकचा पारा चढल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. या वादाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र मैदानावर अशा प्रकारे वाद होणे हे चाहत्यांसाठी धक्कादायक ठरले आहे.
हार्दिकची कामगिरी चोख –
हार्दिक पंड्याचा मुरली कार्तिकशी वाद झाला.
मैदानाबाहेरील या वादाचा परिणाम हार्दिकच्या खेळावर झाला नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात हार्दिकने शिस्तबद्ध गोलंदाजी केली. त्याने ३ षटकांत केवळ २५ धावा देत एका फलंदाजाला बाद केले. भारताने २०९ धावांचे मोठे लक्ष्य अवघ्या १५.२ षटकांत पूर्ण करून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.





