Hardik Pandya Catch : हार्दिक पंड्याचा ‘सुपरमॅन’ अवतार! हवेत झेपावत एका हाताने टिपला थरारक कॅच; पाहा VIDEO
Hardik Pandya Catch : हार्दिक पंड्याने तिसऱ्या टी-२० सामन्यात डेव्हॉन कॉनवेचा जबरदस्त कॅच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Hardik Pandya Catch vs New Zealand 3rd T20 : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्याने आपल्या चपळाईने सर्वांना थक्क केले आहे. गुवाहाटीच्या मैदानावर हार्दिकने टिपलेला एक अफलातून कॅच सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, यामुळे न्यूझीलंडच्या डावाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. यानंतर न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १५३ धावाच करु शकला. ज्यामुळे भारतीय संघाला विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य मिळाले.
हवेमध्ये झेप अन् जबरदस्त कॅच!
न्यूझीलंडच्या डावातील पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हॉन कॉनवेने मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने हर्षित राणाविरुद्ध स्टेप-आउट करत जागा बनवली, पण चेंडू बॅटवर नीट आला नाही. चेंडू मिड-ऑफच्या दिशेला गेला, जिथे हार्दिक पंड्या क्षेत्ररणासाठी तैनात होता. हार्दिकने आपल्या डाव्या बाजूला हवेत चित्त्यासारखी झेप घेतली आणि एका हाताने अशक्य वाटणारा झेल टिपला. हार्दिक जमिनीवर कोसळला खरा, पण त्याने चेंडूवरची पकड सुटू दिली नाही.
हार्दिक पंड्याने डेव्हॉन कॉनवेचा घेतला जबरदस्त कॅच
हर्षित राणापुढे पुन्हा एकदा कॉनवेचा ‘गेम ओव्हर’
WOW!
How about that for a catch from Hardik Pandya 😎
Wicket in the opening over for Harshit Rana 👏👏
Updates ▶️ https://t.co/YzRfqi0li2#TeamIndia | #INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/vFBWKCB2ze
— BCCI (@BCCI) January 25, 2026
न्यूझीलंडचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेसाठी हा भारत दौरा एखाद्या दुःस्वप्नासारखा ठरला आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या दौऱ्यावर हर्षित राणाने पाचव्या डावात सलग पाचव्यांदा कॉनवेची विकेट घेतली आहे. कॉनवेला या सामन्यात केवळ ६ धावाच करता आल्या.
कॅप्टन सूर्याचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय ठरला योग्य –
गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सूर्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कॉनवे पाठोपाठ रचिन रवींद्रही स्वस्तात बाद झाला. त्यानंतर सहाव्या षटकात जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर टिम सायफर्टला क्लिन बोल्ड करत किवींची अवस्था दयनीय केली. पॉवरप्लेमध्येच न्यूझीलंडचा टॉप ऑर्डर पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला.





