The Ten 2024 athletics meet (California, USA) : आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेता भारतीय धावपटू गुलवीर सिंग याने रविवारी कॅलिफोर्निया येथील सॅन जुआन कॅपिस्ट्रानो येथे आयोजित द टेन 2024 ऍथलेटिक्स मीटमध्ये ( The Ten 2024 athletics meet ) पुरुषांच्या 10000 मीटरमध्ये दीर्घकाळापर्यंत असलेला राष्ट्रीय विक्रम मोडला.
27:41.81 च्या वेळेसह, गुलवीरने अमेरिकन ड्रू हंटरच्या नंतर दुसरे स्थान पटकावले, ज्याने 27:38.87 अशी वेळ नोंदवली. या स्पर्धेत भारताचा पूर्वीचा राष्ट्रीय विक्रम 28:02.89 होता, जो सुरेंद्र सिंगने सेट केला होता आणि तो जवळपास 16 वर्षे कायम होता. मात्र, गुलवीरचा ( Indian runner Gulveer Singh ) हा प्रयत्न ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यासाठी पुरेसा ठरला नाही. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता वेळ 27 मिनिटे आहे आणि त्यामुळे भारतीय खेळाडूची फक्त 41 सेकंदांच्या फरकाने ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची संधी हुकली.
जर्मनीच्या आरोन बिएनेनफेल्डने 27:42.83 वेळ नोंदवत तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत सहभागी होणारा आणखी एक भारतीय खेळाडू कार्तिक कुमार 28 मिनिटे 01.90 सेकंद वेळेसह नवव्या स्थानावर राहिला. त्याची वेळही सुरेंद्र सिंगच्या आधीच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा चांगली आहे. याच स्पर्धेत आणखी एक भारतीय ॲथलीट अविनाश साबळे आपली शर्यत पूर्ण करू शकला नाही. 15 व्या लॅपमध्ये 6000 मीटरचे अंतर पूर्ण करून तो निवृत्त झाला.
All England Open 2024 (Badminton) : लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात…
महिलांच्या 10,000 मीटर शर्यतीत भारताच्या पारुल चौधरीने 32 मिनिटे 0 2.08 सेकंद वेळेसह 20 वे स्थान पटकावले. पॅरिस ऑलिम्पिक पात्रता 30 मिनिटे, 40.00 सेकंदाची वेळ पूर्ण करण्यात ती देखील अपयशी ठरली.