सातारा, (प्रतिनिधी) – स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव दरवर्षी सातारा येथे अभिमानाने छत्रपती श्री शिवप्रतिष्ठानचे मावळे साजरा करतात.
सोमवारी गांधी मैदानावर या बलिदान मासाची सांगता धर्मवीर संभाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून तसेच गांधी मैदानावर 54 फूट उंच आणि 34 फूट अरुंद अशा आकारातील भव्य महा रांगोळी अनुप दळवी व शिवप्रतिष्ठानच कार्यकर्त्यांनी काढून धर्मवीर संभाजी महाराजांना एक अनोखे अभिवादन केले आहे.
बलिदान मास म्हणून सुमारे महिनाभर फाल्गुन शुद्ध अमावसेपर्यंत दररोज धर्मवीर संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन त्यांचे गुणगान करणारी कवने, पोवाडे ,शाहिरी गीते व आरती करून अभिवादन ही करतात. दरम्यान सातारा शहरातून या बलिदान दिनाचे औचित्य साधून सायंकाळी गांधी मैदानावरून भव्य मूकपदयात्रा काढून संभाजी महाराजांना या पदयात्रेतून मशाली उजळत अभिवादन करण्यात आले.
या बलिदान दिनाचे औचित्य साधून सातारा शहरातील गांधी मैदानावर दोन दिवस धारकर यांनी स्वच्छता मोहीम राबवली व रविवारी रात्री 9 वाजता काढण्यासाठी सुरू केलेली भव्य महा रांगोळी तब्बल 12 तासांचा अवधी घेत पूर्ण करत हे अतिशय सुरेख विविध रंगातील देखणे धर्मवीर संभाजी महाराजांचे चित्र रेखाटून एक अनोखी अशी अभिवादनाची पद्धत सातारकरनी समस्त मराठी माणसांपुढे ठेवल्याचे विशेष कौतुक सातारा शहर परिसरात होत होते काढलेली ही महा रांगोळी पाहण्यासाठी शहरातूनच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने रात्री उशिरापर्यंत राजवाडा