TATA Tiago EV, Nexon EV Price- टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि. (टीपीईएम) या टाटा मोटर्सच्या उपकंपनीने त्यांच्या सर्वाधिक विक्री होणार्या ईव्ही नेक्सॉन ईव्ही व टिएगो ईव्हीच्या किमती कमी केल्या. नेक्सॉन ईव्हीच्या किमतीमध्ये जवळपास 1.2 लाख रूपयांची घट झाली आहे.
टिएगो ईव्हीच्या किंमतीमध्ये जवळपास 70,000 रूपयांची घट झाली आहे, ज्यामुळे बेस मॉडेलची किंमत 7.99 लाख रूपयांपासून सुरू होते.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या पंच ईव्हीच्या सुरूवातीच्या किमतींमध्ये कोणताच बदल झालेला नाही, कारण ते आधीच नजीकच्या भविष्यात बॅटरीच्या किमतीत घट होण्यास कारणीभूत आहेत.
किमतीमधील या कपातीबाबत मत व्यक्त करत टीपीईएमचे चीफ कमर्शियल ऑफिसर विवेक श्रीवत्स म्हणाले, ईव्हीच्या एकूण किमतीमध्ये बॅटरी खर्चांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. नजीकच्या काळात बॅटरी सेल किमती स्थिर होण्यासह भविष्यात त्यांच्या किमतींमध्ये संभाव्य कपात पाहता आम्ही ग्राहकांना फायदे देण्याचे सक्रिय पाऊल उचलले आहे.
ईव्हींमध्ये गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असताना आमची ईव्हींना देशभरात अधिक प्रमाणात उपलब्ध करून देत त्यांच्या अवलंबतेला चालना देण्याची मिशन आहे. ईव्हीने प्रबळ विकास गती दाखवली आहे आणि एकूण प्रवासी वाहन उद्योग विकासामध्ये मोठे योगदान देत आहेत. 2023 मध्ये ईव्ही विभागाने 90 टक्क्यांहून अधिक वाढ केली.
ही विकासगती 2024 मध्ये देखील सुरू आहे, जेथे ईव्ही विक्रीने जानेवारी 2024 मध्ये वार्षिक 100 टक्क्यांच्या वाढीची नोंद केली. टीपीईएम 70 टक्क्यांहून अधिक बाजारपेठ हिस्सासह या झपाट्याने विकसित होणार्या विभागात मार्केट लीडर आहे.