मुंबई – उद्या (दि. १२) पासून दूरदर्शन वाहिनीवर 1ली ते 12 वी पर्यंतच्या अभ्यासक्रमवर आधारित कार्यक्रम सुरु होणार आहे. यापूर्वी देखील दूरदर्शन वाहिनीने लॉकडाऊनच्या काळात घरी बसलेल्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी काही गाजलेल्या मालिकांचे पुनःप्रक्षेपण केले होते.
दरम्यान, आता पुन्हा एकदा दूरदर्शनवर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमवर कार्यक्रम दाखवले जाणार आहे. सकाळी १०:३० ते ११ इयत्ता पहिली ते पाचवी, ११ ते १२ इ.६ वी ते ९ वी व ११वी आणि १ ते २ इ.१० वी व १२ वी अशी या कार्यक्रमांची वेळ असणार आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या काळात सुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या घरी बसून शिक्षणाचा आनंद घेता येईल.