नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे भारतात सोन्याचा दर 242 रुपयांनी वाढून 47,242 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 543 रुपयांनी वाढून 62,248 रुपये प्रति किलो झाला. एचडीएफसी सिक्युरिटीजचे संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये सोन्याचे दर काही काळ अस्थिर राहण्याची शक्यता आहे.
जर जागतिक आर्थिक परिस्थिती नव्या करोनामुळे बिघडली तर सोन्याचा दर वाढू शकतो. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,794 डॉलर व चांदीचा दर 23.34 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.