गोल्ड बॉन्डच्या विक्रीतून 18 लाखांहून अधिक गुंतवणूक

टपाल खात्याच्या आवाहनाला पुणे विभागातून मोठा प्रतिसाद

पुणे – टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे सोव्हेरिन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन गुंतवणूकदारांना केले होते. अवघ्या पाच दिवसांमध्ये पुणे विभागात तब्बल 18 लाख 52 हजार 354 रुपये किंमतीची गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली.

टपाल खात्यातर्फे 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान ही योजना राबविण्यात आली. पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांतून त्यास चांगला प्रतिसाद मिळाला, असे पुणे विभागाचे सहायक पोस्ट मास्तर जनरल आर. एस. गायकवाड यांनी सांगितले.

पुणे सीटी ईस्टमध्ये आठ बॉन्डच्या विक्रीतून 11 लाख 46 हजार 208 रुपयांची गुंतवणूक झाली. तर, पंढरपूरमध्ये तीन बॉन्डच्या विक्रीतून 30 हजार 702 रुपयांची गुंतवणूक झाली.

सातारामध्ये एका बॉन्डच्या विक्रीतून 5 हजार 117 रुपयांची गुंतवणूक झाली. तसेच, सोलापूरमध्ये 47 बॉन्डच्या विक्रीतून 6 लाख 70 हजार 327 रुपयांची गुंतवणूक गुंतवणूकदारांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.