नवी दिल्ली – जागतिक बाजारातील संकेतानुसार भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बरीच घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 199 रुपयांनी कमी होऊन 46,389 रुपये प्रति 10 ग्रॅम तर चांदीचा दर 250 रुपयांनी कमी होऊन 62,063 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. रुपयाचा दर शुक्रवारी वाढला होता. आजही रुपयाच्या मूल्यात वाढ झाल्यामुळे सोबत सोन्याचे दर कमी होत असल्याचे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.