नवी दिल्ली – सध्या डॉलरचा भाव अस्थिर असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारात अस्थिर आहेत. त्यामुळे आज भारतीय बाजारात सोन्याचे दर घसरले तर चांदीचा दर वाढला.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 66 रुपयांनी कमी होऊन 46,309 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 332 रुपयांनी वाढून 67, 248 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,782 डॉलर तर चांदीचा दर 26.17 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर स्थिरावल्यानंतर सोने आणि चांदीचे दर स्थिर होतील. भारतामध्ये आगामी काळामध्ये बरेच सण येणार आहेत. त्यामुळे भारतामध्ये खरेदी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.