‘गणपती बाप्पा’ सांताक्लॉजच्या रूपात.! भाजपच्या जाहिरातीवरून राजकारण तापलं, विरोधकांनी चांगलंच सुनावलं

Ganapati Bappa | Santa Claus | BJP Advertisement : नाताळ सणाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या एका जाहिरातीमुळे महाराष्ट्रात नव्या वादाला तोंड फुटले आहे. या जाहिरातीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट ‘सांताक्लॉज’च्या वेशात दाखवण्यात आल्याने हिंदुत्ववादी संघटना आणि विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे.
“हा हिंदू अस्मितेचा अपमान!” – आमदार सतेज पाटील यांचा घणाघात
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी भाजपच्या “संस्कृती रक्षक” असण्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सतेज पाटील म्हणाले, हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा…सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे.
हिंदू संस्कृतीचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा आव दाखवणाऱ्या भाजप सरकारचा दुटप्पीपणा पहा…सांस्कृतिक मंत्रालयाच्या जाहिरातीत महाराष्ट्राचं आराध्य दैवत गणपती बाप्पांना थेट सांताक्लॉजच्या रूपात दाखवले आहे. हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी… pic.twitter.com/H6kem1RxVj
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) December 26, 2025
हा प्रकार हिंदू संस्कृतीचा आणि श्रद्धेचा अपमान नाही का? सरकारचा पीआर करण्यासाठी दैवतांचे रूप बदलणे, हेच का स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे कर्तव्य? श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मिता यांचा बाजार मांडून पीआर करण्याची ही वृत्ती आजची नाही. निवडणुकांसाठी “हिंदुत्व” जपणाऱ्या भाजप सरकारने हिंदू भावनांशी केलेला खेळ निषेधार्ह आहे.
“बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला” – मनसेचा हल्लाबोल !
मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही या जाहिरातीवरून भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपच्या वागण्यातील विसंगतीवर बोट ठेवत त्यांनी संताप व्यक्त केला. गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते.
गणपती बाप्पाला सांताक्लॉजच्या वेशात दाखवलेली केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाने दिलेली ही जाहिरात पाहून तीव्र संताप होत आहे. काल दिवसभर भाजपचे लोक विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करणाऱ्या लोकांना मारहाण करत होते. तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते.… pic.twitter.com/uM1gtNwDpH
— Yashwant Killedar (@YKilledar) December 26, 2025
तर दुसरीकडे मोदी स्वतः चर्च मध्ये जाऊन ख्रिसमस साजरा करत होते. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपला खरंच हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही. गणपती बाप्पाचा असा अपमान करायचा नालायकपणा करून त्यांनी हे सिद्ध केलं आहे. त्यांच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाटला आहे.
एकीकडे ख्रिश्चन मिशनरी धर्मांतर करून घेत आहेत, अशी बोंब मारायची आणि पंतप्रधानांनी त्यांची स्तुती करायची. हा निव्वळ हिंदूंच्या भावनेचा अपमान आहे…सत्तेसाठी लोकांना हाणामाऱ्या करायला लावणारी भाजप आता हिंदूंच्या देवांचा अपमान करतेय….केंद्र सरकारने त्वरित सर्व हिंदूंची माफी मागावी. असं त्यांनी म्हंटल आहे.
नेमका वाद काय?
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने नाताळच्या पार्श्वभूमीवर वर्तमानपत्रांत जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींमध्ये गणपती बाप्पांच्या प्रतिमेला सांताक्लॉजची टोपी आणि वेशभूषा केल्याचे दिसून येते. या ‘क्रिएटिव्हिटी’मुळेच आता भाजप सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे.





