Video: सांता क्लॉजचा ड्रेस घालून वस्तूंची डिलिव्हरी करत होता झोमॅटोचा कर्मचारी, भररस्त्यात काढायला लावले कपडे

Delivery Boy Forced to Remove Santa Claus Costume: बुधवारी ख्रिसमसचा सण देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. या निमित्ताने ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक खासगी कंपन्यांनीही विविध कार्यक्रमाचे केले होते. मात्र, मध्यप्रदेशचे इंदौर येथे सांता क्लॉजचा ड्रेस घालून काम करणाऱ्या झोमॅटो कंपनीच्या एका डिलिव्हरी बॉयला कपडे काढण्यास सांगण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंदौरमध्ये झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांकडून सांता क्लॉजचा ड्रेस घालून वस्तूची डिलिव्हरी दिली जात होती. मात्र, एका डिलिव्हरी बॉयला हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच अडवण्यात आले व सांता क्लॉजचा ड्रेस काढण्यास सांगण्यात आले.
“हिंदू हो कर सांता क्लास की ड्रेस पहनते हो?
A right-wing group member coerced Mr. Arjun, a Zomato delivery partner, to remove his Santa Claus costume.
In celebration of #Christmas2024, Zomato had provided Santa Claus outfits to spread holiday cheer. pic.twitter.com/xFoYHnAayU
— काश/if Kakvi (@KashifKakvi) December 25, 2024
रिपोर्टनुसार, हिंदू जागरण मंचाचे जिल्हा समन्वयक सुमित हार्डिया यांनी या डिलिव्हरी बॉयला अडवून भर रस्त्यात सांता क्लॉजचा ड्रेस काढण्यास सांगितले. हिंदू सणांच्या वेळी असा पोशाख घालून संदेश का दिला जात नाही? ख्रिश्चन आणि मुस्लिम सणांमध्ये डिलिव्हरी बॉईजना असा प्रचार करण्याची मुभा असते, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.
यावेळी हिंदू जागरण मंचाचे कार्यकर्ते झोमॅटोच्या कर्मचाऱ्याला याबाबत प्रश्नही विचारतात. हिंदू सणांच्या दिवशी प्रभू श्रीरामासारखे कपडे, भगव्या रंगाचे कपडे का घालून जात नाही?, असे प्रश्न त्यांच्याकडून विचारले जातात. झोमॅटोचा कर्मचारी सांगतो की, त्याला कंपनीकडून हा ड्रेस घालण्यास देण्यात आला आहे. यावेळी हिंदू जागरण मंचाच्या कार्यकर्त्यांकडून ‘जय श्री राम’ अशा घोषणाही दिल्या जातात. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.





