Ramrao Wadkute :राज्यसभा खासदार डॉ.रामराव वडकुते यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन; हिंगोली जिल्ह्यावर शोककळा
Ramrao Wadkute : धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा ओबीसी चेहरा हरपला

शिवशंकर निरगूडे
हिंगोली: जिल्ह्यातील भाजपचे राज्यसभा खासदार आणि मराठवाड्यातील धनगर समाजाचे प्रमुख नेते रामराव सखाराम वडकुते यांचे रविवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) उपचार सुरू असताना वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
अवघ्या सात महिन्यांपूर्वीच त्यांची राज्यसभेवर निवड झाली होती. त्यांच्या निधनाने भाजपसह मराठवाड्यातील ओबीसी चळवळीला मोठा धक्का बसला आहे.
धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा ओबीसी चेहरा
रामराव वडकुते हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागातील होते. धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारा ओबीसी चेहरा म्हणून भाजपने त्यांना राज्यसभेवर संधी दिली होती. मार्च २०२६ मध्ये भाजपने महाराष्ट्रातील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यात वडकुते यांचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी खासदारकीची शपथ घेतली होती.
वडकुते यांना राजकीय आणि सहकार क्षेत्राचा अनुभव होता. त्यांनी शेळी-मेंढी महासंघाचे अध्यक्षपद भूषवले होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या वडकुते यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांची हिंगोली भाजप जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली.
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख आणि प्रभारी, तसेच जालना ग्रामीण जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा दोन वेळा नेतृत्वाला मुखला आहे. याआधी दिवंगत राज्यसभेचे खासदार राजू सातव यांनी देखील या पदावर असताना जगाचा अखेरचा निरोप घेऊन गेले होते आणि आज राज्यसभेत खासदार रामरावजी वडकुते यांनी देखील जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे
दरम्यान, सायंकाळी दिल्ली निवासस्थानी चालत असताना त्यांना अस्वस्थ वाटत होते, त्यामुळे ते स्वतः दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले होते डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार देखील चालू केले होते. मात्र अचानक मध्यरात्रीची प्रकृती खालावली आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने जिल्ह्यासह संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात शोक व्यक्त केला जात आहे.
Vishal Kalate: विशाल कलाटे यांच्या निवडीने भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष





