अहमदनगर – सहा फूट उंची, काळाभोर रंग, दीड टन वजनाचा गजेंद्र (रेडा) अहमदनगरच्या राहुरी येथील कृषी प्रदर्शनात आकर्षणाचं केंद्र बनला आहे. बेळगाव मधल्या विलास नाईक यांचा हा रेडा असून त्यांनी तो खास पंजाबमधून आणला आहे. तो पाच वर्षांचा असून मुरा जातीचा आहे. या रेड्याला पाहण्यासाठी राहुरी आणि पंचक्रोशीतील शेतकरी गर्दी करत आहेत.
मालक विलास नाईक यांनी सांगितले की, गजेंद्रच्या देखरेखीसाठी तीन जण 24 तास कार्यरत असतात. गजेंद्रला दररोज 15 लिटर दूध, दोन किलो सफरचंद गव्हाची कणिक, कडबा आणि वेगवेगळ्या प्रकारचा पशु आहार दिला जातो.
विलास नाईक हे गजेंद्रला वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनात आणि स्पर्धेत घेऊन जातात. कर्नाटकात कर्नाटक किंग तर महाराष्ट्र महाराष्ट्र चॅम्पियन अशी उपाधी गजेंद्रला मिळाली आहे. पंजाब हरियाणामध्ये गजेंद्रला आणखी चांगली किंमत मिळेल असे नाईक यांना वाटते.