चिंबळी – लोकडाऊनमुळे गोरगरीब भाडेकरुंचे हाल होऊ नये म्हणून मोई (ता. खेड) येथील 300 कुटुंबांना मोफत जेवणाची सोय केली आहे. मोईचे सरपंच राहुल गवारी, शिवसेना उपतालुका प्रमुख किरण गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय विद्यार्थी सेना तालुका प्रमुख संघटक गोरख गवारे, तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष मारूती येळवंडे, भारतीय विद्यार्थी संघटक खेड तालुका देवीदास मेदनकर, खेड केसरी रवी गवारे, मोहन गवारे, संजय गवारे, संतोष गवारे यांच्या विषेश प्रयत्नातून गेल्या आठवड्या भरापासून रोज रात्री आठ वाजता 300 कुटुंबांना मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे.