सातारा – जिल्ह्यात करोनामुळे चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी दिली. तर गुरुवारी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील 51 जणांचा करोना रिपोर्ट पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत करोनारुग्णांची संख्या 1543 झाली आहे. तर करोनामुळे 65 जणांचा बळी गेला आहे.
पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष व कराड तालुक्यातील लटकेवाडी, सावडे येथील 52 वर्षीय पुरुष या दोन बाधितांचा कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर फलटण तालुक्यातील पाडेगाव येथील 62 वर्षीय पुरुषाचा दि. 8 जुलै रोजी मृत्यू झाला असून त्याचा दि. 7 जुलै रोजी शिरवळ येथे घेण्यात आलेला नमुना पॉझीटिव्ह असल्याचे पुणे प्रयोगशाळेने कळविले आहे.
उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना लोणंद येथे त्याचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले आहे. गोडोली, शाहूनगर येथील 65 वर्षीय करोनाबाधित (सारी) असलेल्या पुरुषाचा क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, या पुरुषाला थायरॉईडचा त्रास होता, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील विविध रुग्णालये व करोना केअर सेंटरमध्ये येथे उपचार घेत असलेल्यांमधील निकट सहवासातील 45, सारीचे 5 आणि आरोग्य कर्मचारी 1 अशा एकूण 51 नागरिकांचा अहवाल करोनाबाधित आला आहे. या 51 रुग्णांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील संघर्ष कॉलनीतील 29 वर्षीय पुरुष, नक्षत्र सिटीतील 40 वर्षीय पुरुष, काबूल आळीतील 16 वर्षाचा युवक, खटाव तालुक्यातील विसापूर येथील 44 वर्षीय पुरुष, निमसोड येथील 16 व 19 वर्षीय युवती, वरुड येथील 25 वर्षाचा पुरुष, वडूज येथील 22 वर्षाचा पुरुष, वाई तालुक्यातील पसरणी येथील 17 वर्षीय युवक, 19 वर्षाची युवती, 70 वर्षाचा पुरुष, बोपेगाव येथील 47 वर्षाची महिला., कराड तालुक्यातील मलकापूर येथील 64 वर्षीय पुरुष, उब्रंज येथील 31 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 45 वर्षाची महिला, पाटण तालुक्यातील महिंद येथील 58 वर्षीय पुरुष, माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक येथील 20, 16 वर्षीय युवक, 24 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, मार्डी येथील 60 वर्षीय महिला, जावळी तालुक्यातील पुणवडी येथील 42 वर्षीय पुरुष, 22 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, 50 व 30 वर्षीय महिला व 9 वर्षाचा बालक, 21 वर्षाची महिला, 15 वर्षाची युवती व कास येथील 36 वर्षाची महिला, 13 वर्षाची युवती, 11 वर्षाची बालिका, 53 वर्षाचा पुरुष, 47 वर्षाची महिला, 18 व 17 वर्षाची युवती, कुसुंबी मुरा येथील 32 वर्षाचा पुरुष, सातारा तालुक्यातील रविवार पेठेतील 42 वर्षाचा पुरुष, जिहे येथील 46 वर्षाचा पुरुष, 39 वर्षाची महिला, 46 वर्षाची महिला, 16 वर्षाचा युवक, 50 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 80 वर्षाची महिला, कण्हेर येथील 80 वर्षे वयाच्या दोन महिला, गोडोली, शाहूनगर येथील 65 वर्षीय पुरुष (मृत)., फलटण तालुक्यातील मुनावळे येथील 63 वर्षीय पुरुष, सरडे येथील 28 वर्षीय महिला, मलटण येथील 58 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.