नवी दिल्ली – भारतीय नौदलाचे माजी प्रमुख अॅडमिरल (निवृत्त) एल रामदास यांचे शुक्रवारी लष्करी रुग्णालयात निधन झाले. ९१ वर्षीय रामदास यांनी डिसेंबर १९९० ते सप्टेंबर १९९३ दरम्यान नौदल प्रमुख म्हणून काम केले होते. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. रामदास यांच्या पश्चात पत्नी ललिता रामदास आणि तीन मुली असा परिवार आहे. (Former Navy Chief Admiral L. Ramdas no more)
रामदास यांनी १४९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी मोठी भूमिका बजावली होती. ते पाकिस्तान-इंडिया पीपल्स फोरम फॉर पीस अँड डेमोक्रसीशी संबंधित होते. २००४ मध्ये, त्यांना दक्षिण आशियाचे सैन्य नष्ट करण्यासाठी आणि आण्विक नि:शस्त्रीकरण साध्य करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी शांततेच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
अण्णा हजारेंच्या आंदोलनानंतर जेव्हा अरविंद केजरीवालांनी अनेक मान्यवरांना सोबत घेऊन आम आदमी पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यात रामदास यांचीही महत्त्वाची भूमिका होती. ते एकमेव व्यक्ती होते ज्यांना केजरीवाल त्यांच्या कारमधून निवडणूक आयोगाच्या कार्यालयात घेऊन गेले होते.