फलटणला आज अंत्यसंस्कार
फलटण (प्रतिनिधी ) – फलटणचे सुपुत्र व संघर्षशील नेतृत्व माजी खासदार लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर (वय ७२) यांचे आज पहाटे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा फलटण येथील निवासस्थानाहून सायंकाळी ४ वाजता निघेल आणि अंत्यविधी आईसाहेबनगर, फलटण येथे होईल.
माढा मतदारसंघातील विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांचे ते वङील होत. जिल्हा परिषदेच्या सदस्या जिजामाला नाईक निंबाळकर त्यांच्या स्नुषा आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंङे असा परिवार आहे.