फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने कोलकत्यात 70 फुट उंच पुतळ्याचे केलं अनावरण, चाहत्यांची अलोट गर्दी; ‘या’ दिवशी येणार मुंबईत

Footballer Lionel Messi | दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ‘गोट इंडिया टूर’ अंतर्गत भारतात दाखल झाला आहे. मेस्सी हा UNICEF चा ब्रँड अँबेसेडर आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून तो भारतात GOAT इंडिया टूरमध्ये सहभागी होत आहे.
कोलकातामधील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर तो पहाटे 3 च्या सुमारास उतरला. मेस्सीसोबत लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल देखील भारतात आले आहेत. 2022 च्या फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार मेस्सीचे भारतातील तीन दिवसीय दौरेची सुरुवात कोलकात्यात झाली आहे. यावेळी तो कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि दिल्ली या चार वेगवेगळ्यांना शहरांना भेट देणार आहे.
मेस्सीचे भारतातील स्वागत जोरदार झाले. हजारो चाहते रस्त्यावर त्याची एकझलक पाहण्यासाठी जमले होते. ते ‘मेस्सी, मेस्सी!’ असे म्हणत जल्लोष करत होते. चाहत्यांनी अर्जेंटिनाची जर्सी, झेंडे, बॅनर आणि पोस्टर्स घेतले होते.
#WATCH | Fans of Argentine footballer Lionel Messi chant his name and wave the Argentine flag and flags supporting the tag ‘Messians of Bengal’, ardently waiting to catch a glimpse of their star outside the private hotel where Messi will stay on his first day in Kolkata. pic.twitter.com/ps7TCn4PgA
— ANI (@ANI) December 12, 2025
कसे असणार वेळापत्रक ?
आज सकाळी कोलकाता येथे मेस्सीने त्याच्या 70 फूट उंच पुतळ्याचं अनावरण केले आहे. त्यानंतर साल्ट लेक स्टेडियममध्ये संगीत कार्यक्रम आणि एक मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना आयोजित केला असून तो त्यात सहभागी होणार आहे. लिओनेल मेस्सी साल्ट लेक स्टेडियममध्ये माजी भारतीय क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांना भेटण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील त्याचा सन्मान करु शकतात. Footballer Lionel Messi |
हैदराबादला रवाना होणार
कोलकाता नंतर, मेस्सी हैदराबादला रवाना होईल, जिथं त्याचा कार्यक्रम हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियममध्ये होईल. त्यांचा संघ शनिवारी संध्याकाळी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांच्या संघाविरुद्ध मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. लिओनेल मेस्सी शनिवारी दुपारी 4 वाजता हैदराबादमध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे.
त्यानंतर तो रविवारी सकाळी मुंबईला रवाना होईल. तिथून तो नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार आहे. मेस्सीच्या कार्यक्रमांसाठी सर्व ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. Footballer Lionel Messi |
मेसी भारत दौऱ्याचा समारोप दिल्लीमध्ये करणार आहेत. १५ डिसेंबरला, तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून, त्यानंतर अरुण जेटली स्टेडियम येथे एका कार्यक्रमात सहभागी होऊन त्याचा भारत दौरा संपवणार आहे. Footballer Lionel Messi |
हेही वाचा :





