नवी दिल्ली – एका अल्पवयीन तरुणाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गर्दीच्या ठिकाणी चौकामध्ये सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा होता. या पुतळ्याजवळ जाऊन तरुणाने सिगारेट ओढत धूर सोडला. त्यानंतर थेट पुतळ्याच्या तोंडाजवळ तरुणाने सिगारेट नेण्याचे धाडस केले असल्याचे पाहायला मिळते. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला.
छत्तीसगडमधील ही दुर्दैवी घटना आहे. छत्तीसगडच्या बिलासपूर येथील सिपट चौकात घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. यानंतर सोशल मिडीयावर याविरोधात संतापाची लाट उसळल्याचे देखील पाहायला मिळाले. व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी याबाबत योग्य ते पाऊल उचलत हालचाल सुरु केली.
व्हायरल व्हीडोमधील तरुनाला पोलिसांनी अटक देखील केली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाला पॉलिसी खाक्या दाखवत सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यास भाग पाडले. विटंबना करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पुतळ्याच्या पाय पडायला लावून हार देखील अर्पण करायला लावला. या तरुणाचे हे दोन्हही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
#बिलासपुर (छग) में नेताजी सुभाषचंद्र बोस जी की मूर्ति में सिगरेट के धुएँ को छल्ला बनाने वाला पकड़ा जा चुका है।
उसके बाद @PoliceBilaspur ने जोरदार अभिवादन किया😂😂😂😂
जिनका असर है कि अब सीधे जाकर माला चढ़ाकर, अगरबत्ती जलाकर नेता जी के आगे हाथ जोड़कर खड़ा है, पैर छू रहा है। pic.twitter.com/R4MMSCGjR6
— Manish Tiwari (@livemanish_) March 11, 2023
सिगारेट ओढणाऱ्या तरुणाने इतकी डेरिंग नेमकी का केली याचा उत्तर अद्याप समोर आलेलं नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना या मुलाला शिक्षा करण्याची अंगानी केली होती. ज्या व्यक्तीने या तरुणाचा व्हिडीओ शूट केला त्याच्या तक्रारीवरूनच पोलिसांनी ही कारवाई केल्याचे समजते. पोलिसांनी सर्वांना शांतात निर्माण करण्याचे आवाहन केले असून पुढील तपास सुरु आहे.