Lionel Messi : लिओनेल मेस्सी रोहित-विराटबरोबर खेळणार क्रिकेट! ‘या’ तारखेला वानखेडे स्टेडियमवर रंगणार रोमांचक सामना

वानखेडेमध्ये मेस्सी खेळणार क्रिकेट सामना –
अहवालानुसार, लिओनेल मेस्सी 14 डिसेंबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सात खेळाडूंच्या क्रिकेट सामन्यात सहभागी होणार आहे. या सामन्यात क्रिकेटचे दिग्गज सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील सहभागी होणार आहेत. वानखेडे स्टेडियमने यापूर्वी 2011 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलसह अनेक ऐतिहासिक सामने पाहिले आहेत, ज्यात भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला होता.
कोलकातामध्ये मेस्सीचा सन्मान आणि फुटबॉल वर्कशॉप –
🚨 MESSI VS DHONI, VIRAT, ROHIT. 🚨
– Lionel Messi could play a 7-side cricket match with Virat Kohli, MS Dhoni, Rohit Sharma and Sachin at the Wankhede Stadium. (Express Sports). pic.twitter.com/4UE8apwRqn
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 1, 2025
मेस्सी कोलकातामध्ये ईडन गार्डन्स स्टेडियमवर एका विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहे, जिथे त्यांचा सन्मान केला जाणार आहे. या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय, मेस्सी कोलकातामध्ये मुलांसाठी फुटबॉल वर्कशॉप आयोजित करणार आहे आणि एक फुटबॉल क्लिनिक लॉन्च करणार आहे. त्यांच्या सन्मानार्थ ‘Goat Cup’ नावाचा टूर्नामेंटही आयोजित केली जाणार आहे.
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडला बसला मोठा धक्का! ख्रिस वोक्सच्या दुखापतीमुळे संघाच्या वाढल्या अडचणी
केरळमध्ये अर्जेंटिना संघासोबत मैत्रीपूर्ण होणार सामना –
🚨 MESSI × SACHIN × ROHIT × KOHLI × DHONI 🚨
– Messi is likely to play a Seven-a-side Cricket match at Wankhede Stadium in December with Big Superstars of Indian Cricket. [Devendra Pandey] pic.twitter.com/Qw8VOMbRzc
— Johns. (@CricCrazyJohns) August 1, 2025
केरळच्या क्रीडा मंत्र्यांनी 6 जून 2025 रोजी जाहीर केले की, लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना फुटबॉल संघ ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2025 मध्ये केरळमध्ये मैत्रीपूर्ण सामना खेळणार आहे. हा सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. याबाबत केरळ सरकारशी चर्चा पूर्ण झाली आहे.
2011 मध्ये आला होता मेस्सी-
यापूर्वी 2011 मध्ये मेस्सीने कोलकात्याच्या साल्ट लेक स्टेडियमवर व्हेनेझुएलाविरुद्ध मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना खेळला होता. आता 14 वर्षांनंतर तो पुन्हा भारतात येत आहे, ज्यामुळे भारतातील फुटबॉल चाहते प्रचंड उत्साहित आहेत.





