Kolkata Rape Case : राजीनामा द्या.! कोलकाता सामूहिक अत्याचार प्रकरणावर भाजप आक्रमक

Kolkata | Gang rape case | Mamata Banerjee – कोलकात्याच्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. भारतीय जनता पार्टीने शनिवारी ममता बॅनर्जी यांनी माफी मागण्याची आणि मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे.
लॉ कॉलेजमध्ये मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारातील मुख्य आरोपींचे सत्ताधारी तृणमूल पक्षाशी (टीएमसी) संबंध आहेत. त्यामुळेच भाजप ममता बॅनर्जींवर माफी मागण्यासाठी आणि राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहे.
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी पीडितेचे निवेदन वाचताना बलात्काराची माहिती दिली. ते म्हणाले की, पीडिता आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांना धमकावण्यात आले होते. हा क्रूर आणि गांभीर गुन्हा राजकीयदृष्ट्या प्रेरित होता.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अध्यक्ष जेपी नड्डा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे, जी पश्चिम बंगालला भेट देईल. दोन विद्यमान खासदार बिप्लब कुमार देब आणि मनन कुमार मिश्रा यांच्याव्यतिरिक्त, दोन माजी खासदार सत्यपाल सिंह आणि मीनाक्षी लेखी यांचा या समितीत समावेश असेल.
माध्यमांशी बोलताना संबित पात्रा म्हणाले की, या घटनेने संपूर्ण देश दुःखी आहे. ज्या राज्यात एक महिला मुख्यमंत्री आहे, तिथे महिलांविरूद्ध गुन्हे घडत आहेत. ममता बॅनर्जी यांनी माफी मागावी आणि तात्काळ राजीनामा द्यावा. सामूहिक बलात्काराचा मुख्य आरोपी मनोजित मिश्रा हा तृणमूल काँग्रेस विद्यार्थी संघटनेचा नेता आहे.
इतर आरोपी विद्यार्थी संघटनेशीही संबंधित होते. मुख्यमंत्री असण्याव्यतिरिक्त, ममता बॅनर्जी राज्याच्या गृहमंत्री देखील आहेत. असे असूनही त्या महिलांवरील गुन्ह्यांना गांभीर्याने घेत नाहीत यावरून असे दिसून येते की ममता सरकार अत्यंत बेजबाबदार आहे.





