श्रीनगर – येथील जगप्रसिद्ध दल सरोवरात (Dal sarovar) शनिवारी पहाटे लागलेल्या आगीमध्ये तीन हाऊसबोट (House boat) जळून खाक झाल्या. या दुर्घटनेत तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. (Fire In Shrinagar)
या मृतांमध्ये एक पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे, तर तिसऱ्या जळीताची ओळख पटू शकलेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती आहे. (Shrinagar News)
तत्पूर्वी या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग नियंत्रणात आणली. यात हाऊसबोटींचे प्रचंड नुकसान झाले असून, ते कोट्यवधींच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. (Jammu and Kashmir)
दरम्यान, दल सरोवर पाहण्यासाठी गेलेले पर्यटक हाऊसबोटीतूनच फिरतात. पर्यटकांमध्येही या बोटींचे प्रचंड आकर्षण असते. या बोटींची बांधणीही खास पद्धतीने केली जाते. श्रीनगरमधील हे दल सरोवर बघण्यासाठी जगभरातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. (*Dal Sarovar videl)