शेवटी संजय राऊतांनी करून दाखवलचं..! …म्हणून त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही; ३ महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर…

Sanjay Raut : राजकारणात कोण कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो. अशी एक जुनी म्हण मराठीत प्रचलित आहे. ही म्हण आता सांगण्यामागचे कारण म्हणजे राज्यात २०१९ पासून राजकीय चित्र जसे पाहिले गेले. तसे प्रत्यक्षात घडले नाही. शिवसेनेने भाजपसोबत काडीमोड घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत संसार थाटाला; पण हे राजकीय समीकरण फार काळ टिकू शकले नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे बंड त्यामुळे दोन शिवसेना पक्ष तयार झाले. (त्याला गटही म्हटले जाते) भाजप शिवसेना (शिंदे) यांचे सरकार सत्तेत आले आणि अजित पवारांनी त्यांना टाळी देत ४० आमदारांसह सत्तेत सामील झाले.
यामुळे शिवसेनेसारखीचे दोन राष्ट्रवादी पक्ष झाले. सध्या तरी भाजप शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांचे चांगलं चाललयं असं म्हणायला काही हरकत नाही. नुकतीच महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अधिकृत युतीची घोषणा करण्यात आली. या दोन्ही भावांना कुटुंबीक आणि राजकीय भूमिकेसाठी एकत्र आण्यासाठी कुणी महत्वाची भूमिका निभावली हे सगळ्यांना माहितच आहे.
2019 चा यशस्वी प्रयोग
संजय राऊत….’सामाना’चे संपादक. हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थांनी महत्वाचे आहे. राऊत विरोधकांना भिडतात. सत्ताधाऱ्यांच्या टीकेला त्याच भाषेत सडेतोड उत्तर देतात. २०१९ मध्ये मविआचे सरकार आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांना एकत्र आणण्यासाठी संजय राऊतांनी केलेली मध्यस्थी विसरून चालत नाही. राज्यात आघाडीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी सज्ज होते, त्यावेळी सर्वांसाठी हे राजकीय समीकरण धक्का देणारे ठरले. पण या सगळ्यात संजय राऊतांनी ज्या किमान समान कार्यक्रमावर एकमत होत नव्हते, त्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी- शिवसेना यांचा घरोबा झाला. त्यामुळे संजय राऊतांना राजकारणातून मायनस करून चालत नाही. 2019 चा मविआचा प्रयोग त्यांनी यशस्वी करून दाखवलाचं.
नरकातला स्वर्ग पुस्तकामुळे चर्चेत
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील काही आमदारांसोबत बंड करून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ठाकरेंच्या गोट्यातील आमदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी राऊतांनी भूमिका बजावली. ऑगस्ट 2022 मध्ये संजय राऊतांना ईडीकडून अटक झाली. काही महिने ते जेलमध्ये होते. त्यानंतर त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली. त्यांनंतर ते थेट मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. दरम्यानच्या काळात त्यांनी ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक लिहिले. या पुस्तकातील राजकीय घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला होता. काही खुलासे देखील केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले होते. 2024 मध्ये इंडिया आघाडीच्या अनेक बैठकांमध्ये संजय राऊतांनी शिवसेनेचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती दर्शवली होती.
ठाकरेंसाठी काहीपण!
ते गंभीर आजाराने ग्रस्त असतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर उपस्थित राहिले होते. आता उद्धवसेना-मनसे यांचे मनोमिलन करण्यातही मोठा वाटा संजय राऊत यांचाच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या घोषणेवेळी पत्रकार परिषदेत ते व्यासपीठावर स्थानपत्न झाले होते. पत्रकार परिषद संपल्यानंतर राज ठाकरेंनी संजय राऊतांना मध्ये बोलावून फोटो काढून घेतला. यावरूनच संजय राऊत यांचे ठाकरेंना एकत्र आणण्यात किती मोठा वाटा आहे हे लक्षात येते. राज आणि उद्धव यांची युती महापालिका निवडणुकीत कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. नव्या राजकीय नांदीला नागरिक कसा प्रतिसाद देणार हे आगामी काळात समजेलच; पण संजय राऊतांना राजकारणातून मायनस करून चालत नाही.
हेही वाचा : Year Ender 2025: वर्षभरात पॅरिस करारापासून ते टॅरिफपर्यंत…ट्रम्पच्या ‘या’ ५ निर्णयांनी जगाला हादरवले





